हैदराबाद : श्रावण महिन्यात भगवान शंकराच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. यंदा उत्तरेकडच्या राज्यांमध्ये श्रावण महिना 4 जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. महाराष्ट्रात श्रावण अधिक मास १८ जुलैपासून सुरु होईल. श्रावण महिना सुरू होताच शिवालय आणि धार्मिक श्रद्धा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. श्रावण महिन्यात भोले शंकराच्या पूजेसाठी सर्वात उपयुक्त बाबींमध्ये बेलपत्राची गणना केली जाते. पूजेमध्ये बेलपत्राचे विशेष महत्त्व असून त्याशिवाय शिवपूजा अपूर्ण मानली जाते.
श्रावणमध्ये शिवाची पूजा
- बेलपत्राची गरज का आहे?भोलेनाथ साक्षात बेलाच्या झाडावर राहतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. भोलेनाथाला बेल झाडाची फळे, फुले आणि पाने खूप प्रिय आहेत. हे बेलपत्र अर्पण करण्याच्या परंपरेबद्दल काही आख्यायिका आहेत. त्यामुळे शिवपूजेत त्याचे महत्त्व वाढले आहे.
- समुद्रमंथन आणि बेलपत्र :श्रावण महिन्यातच समुद्रमंथन झाल्याचे सांगितले जाते. समुद्रमंथनानंतर जे विष बाहेर पडले, ते विष देवाधिदेव महादेवाने संपूर्ण विश्वाला वाचवण्याच्या उद्देशाने आपल्या घशात घेतले. हलाहल विषाच्या परिणामामुळे शिवाचा घसा निळा झाल्याचे सांगण्यात येते. याच्या प्रभावाने भोलेनाथचे संपूर्ण शरीर तापू लागले. यावर उपाय म्हणून बेलपत्राचा वापर केला गेला ज्यायोगे विषाचा प्रभाव कमी झाला, अशी एक आख्यायिका आहे.
- बेलपत्राचे महत्त्व : हे कळताच घटनास्थळी उपस्थित सर्व देवी-देवतांनी भोलेनाथाला बेलपत्र अर्पण करण्यास सुरुवात केली. भगवान नीलकंठाने बेलपत्र ग्रहण केल्याचा परिणाम दिसू लागला आणि त्यांच्या शरीरातून विषाचा प्रभाव कमी होऊ लागला. भोलेनाथाला शीतलता लाभावी म्हणून बेलपत्राव्यतिरिक्त जलाभिषेक सुरू करण्यात आला. त्यामुळे बेलपत्र आणि जलाभिषेकची परंपरा सुरू झाली.
बेलपत्राचे काही नियम आहेत :
1. बेलपत्राच्या तीन पानांचा गुच्छ भगवान शंकराला अर्पण केला जातो असे मानले जाते. असे मानले जाते की त्याच्या गाभ्यामध्ये सर्व पवित्र स्थाने राहतात.