विजयनगर (कर्नाटक) : हंपी येथील जगप्रसिद्ध विरुपक्षेश्वर येथे आज भव्य विवाह सोहळा पार पडला. (unique wedding ceremony Hampi temple). विवाहा संबंधी विशेष बाब म्हणजे वर हा कर्नाटकातीलच होता मात्र वधू होती थेट बेल्जियम येथील! हंपी येथे बेल्जियमच्या एका तरुणीने विजयनगर येथील अनंतराजू या तरुणाशी लग्न केले. भारतीय परंपरेनुसार लग्न केलेल्या विदेशी तरुणीचे नाव केमिल आहे. (Belgium Bride Karnataka Groom). जवळपास चार वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या या जोडप्याचे शुक्रवारी सकाळी ९.२५ वाजता कुंभ लग्नाच्या शुभ दिवशी लग्न झाले.
Belgium Bride Karnataka Groom: कर्नाटकचा वर अन् बेल्जियमची वधू! हंपी मंदिरात पार पडला अनोखा विवाह सोहळा - unique wedding ceremony Hampi temple
चार वर्षांपूर्वी हंपी येथे सहलीला आलेल्या केमिलच्या कुटुंबाला अनंतराजू यांनी मदत केली होती. त्यावेळी केमिलच्या कुटुंबीयांना अनंतराजू यांचा प्रामाणिकपणा आवडला होता. त्याचवेळी केमिल आणि अनंतराजू प्रेमात पडले. (Belgium Bride Karnataka Groom).
![Belgium Bride Karnataka Groom: कर्नाटकचा वर अन् बेल्जियमची वधू! हंपी मंदिरात पार पडला अनोखा विवाह सोहळा Etv Bharat](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17030035-thumbnail-3x2-belgium.jpg)
चार वर्षांपूर्वी पडले प्रेमात : अनंतराजू हा हंपी जनता प्लॉटचे रेणुकम्मा आणि स्वर्गीय अंजिनप्पा यांचा मुलगा आहे. तो हम्पीमध्ये ऑटो चालक आणि पर्यटक मार्गदर्शक म्हणून काम करतो. केमिल बेल्जियममधील सामाजिक कार्यकर्ता आहे. दोघांची भेट हम्पीमध्ये झाली. चार वर्षांपूर्वी हंपी येथे सहलीला आलेल्या केमिलच्या कुटुंबाला अनंतराजू यांनी मदत केली होती. त्यावेळी केमिलच्या कुटुंबीयांना अनंतराजू यांचा प्रामाणिकपणा आवडला होता. त्याचवेळी केमिल आणि अनंतराजू प्रेमात पडले.
कोरोना मुळे लांबला विवाह : केमिल आणि अनंतराजू यांचे तीन वर्षांपूर्वी लग्न होणार होते. पण कोरोना महामारी त्यांच्या प्रेमविवाहात अडथळा ठरली. केमिलच्या पालकांची त्यांच्या मुलीचे लग्न बेल्जियममध्ये भव्यपणे केले जावे अशी इच्छा होती. मात्र अनंतराजू आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हा विवाह हम्पीमध्येच हिंदू परंपरेनुसार व्हायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली. शेवटी केमिलच्या कुटुंबाने याला होकार दिला. गुरुवारी संध्याकाळी दोघांचा साखरपुडा झाली आणि आज सकाळी भव्य लग्न पार पडले.