किन्नोर (हिमाचल प्रदेश) -हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात रविवारी झालेल्या भूस्खलनात 9 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मृतांमध्ये जयपूरमधील आयुर्वेद डॉक्टर दीपा शर्माही सामील आहे. डॉक्टर दीपाने मृत्यूच्या काही मिनिट आधी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो पाहून लोक अश्रू ढाळत आहेत.
डॉ. दीपा शर्मा (Dr Deepa Sharma's last tweet ) ने काल दुपारी 12.59 वाजता केलेले शेवटचे ट्वीट सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटिझन्सला दीपाला श्रद्धांजली देत आहेत. कुमार विश्वाससह अनेक लोकांनी ट्विट करून डॉ. दीपा शर्मा हिच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.