चेहऱ्याचे आणि मनाचे सौंदर्य यांचे अतुट नाते आहे. तसेच आपल्या उत्तम प्रकृतीचे आणि सौंदर्याचे देखील अतुट नाते आहे. जर आपण निरोगी असेल, तर त्याचे तेज आपल्या चेहऱ्यावर दिसुन पडते. मात्र, गेल्या काही दिवसांपासुन बदललेल्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याची आणि चेहऱ्याचे सौंदर्य कमी होण्याची प्रक्रीया अनेकांच्या शरीरात घडतांना दिसून येत आहे, यावर उपाय काय ते जाणून घेऊया.
कसे जेवण घेता :तुम्हाला निरोगी व्हायचे आहे किंवा सुंदर दिसायचे आहे. तर शरीराला सर्व पोषक तत्वे संतुलित मिळायला हवीत. वजन नियंत्रित करण्याचा प्रयत्न करताना हे तत्व विसरता कामा नये. कॅलरी मोजत असताना खाणे हे जास्त प्रमाणात खाण्याइतकेच चुकीचे आहे. तुम्हाला रोज मिळणाऱ्या पोषक तत्वांचे तुम्ही निरीक्षण केले आणि तुमच्या आहारात हिरव्या भाज्या, भाज्या, कडधान्ये, दूध आणि अंडी यांचा समावेश असल्याची खात्री केली, तर तुमच्या सर्व समस्या लवकर आटोक्यात येतील.
कधीझोपता:जेव्हा नोकरी आणि नोकऱ्यांचे शिफ्ट बदलतात. परिणामी अश्यावेळी कोणतेही कारण न देता रात्रंदिवस कर्तव्य बजावावे लागत आहे. बराचवेळ डिजिटल गॅझेट्सचा वापर करीत असल्याने, झोपण्याच्या वेळेत बदल झाले. तरी किमान सात-आठ तास गाढ झोप घेतल्याशिवाय थकवा दूर होत नाही. आणि आपण दुसऱ्या दिवशी उत्साहाने काम करु शकत नाही. या गोष्टी लक्षात घेऊनच झोपा. वेळेवर झोपणे आणि उठणे हे शरीरात आनंदी हार्मोन्स निर्माण करतात.