अमृतसर स्वातंत्र्य दिनानिमित्त पंजाबमधील अमृतसरच्या अटारी वाघा सीमेवर ATTARI WAGAH BORDER बिटिंग द रिट्रीट सेरेमनी Beating Retreat Ceremony आयोजित करण्यात आली होती. बीटिंग रिट्रीट सेरेमनी दरम्यान सर्वत्र तिरंगा दिसून आला. यावेळी उपस्थित सर्वांनी देशभक्तीपर गीतावर वंदे मातरम सोबतच जय हिंदचा नारा दिला.
अटारी सीमेवर बिटिंग रिट्रीट सोहळा 1959 मध्ये सुरू झाला. बीटिंग द रिट्रीटमध्ये संघर्षाच्या वेळी बंधुता आणि सहकार्याचे प्रदर्शन केले जाते. या दरम्यान भारत आणि पाकिस्तान देशांचे सैनिक संचलन करतात. या निमित्ताने बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये हा सोहळा होतो. ते पाहण्यासाठी देशभरातून लोक येतात. हा सोहळा दररोज संध्याकाळी अटारी वाघा सीमेवर राष्ट्रध्वज खाली करताना होतो.