सहारनपूर (उत्तरप्रदेश): दरवेळेस वेगवेगळे फतवे काढून एकप्रकारे आदेश देणाऱ्या आणि फतव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जगप्रसिद्ध इस्लामिक शैक्षणिक संस्था दारुल उलूमने आता नवीन फतवा काढला आहे. त्यानुसार दारुल उलूम व्यवस्थापनाने त्यांच्या संस्थेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना दाढी ठेवणे बंधनकारक केले आहे. संस्थेच्या आदेशाच्या विरोधात जात दाढी कापलेल्या चार विद्यार्थ्यांना संस्थेच्या बाहेर काढण्यात आले आहे. दारुल उलूमच्या या कारवाईमुळे मदरशातील विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचवेळी मोठ्या घोषणेनंतर दारुल उलूम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
विद्यार्थ्यांना देणार कठोर शिक्षा:संस्थेच्या व्यवस्थापन यंत्रणेने विद्यार्थ्यांची दाढी काढण्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद असल्याची माहिती देणारी नोटीस चिकटवली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याने दाढी कापली तर त्याच्यावर थेट हकालपट्टीची कारवाई केली जाईल, असे व्यवस्थापन यंत्रणेने नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. याच महिन्यात या आरोपात चार विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याची माहितीही व्यवस्थापनाने नोटीसमध्ये दिली होती.
दारुल उलूमचा निर्णय जगभरात महत्त्वाचा:जगप्रसिद्ध इस्लामिक शैक्षणिक संस्था असलेल्या दारुल उलूममध्ये जगभरातील मुस्लिम विद्यार्थी फक्त इस्लामिक शिक्षणच घेत नाहीत, तर दारुल उलूमचा निर्णय जगभरातील मुस्लिमांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. याच कारणामुळे दारुल उलूम देवबंदला 'फतव्यांचे शहर' म्हटले जाते. दारुल उलूम मॅनेजमेंट मदरसामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. उलेमांनी विद्यार्थ्यांना दाढी ठेवणे आता सक्तीचे केले आहे. यासाठी संस्थेकडून रितसर नोटीस चिकटवण्यात आली आहे.