मुंबईकोरोना अद्याप पुर्णपने संपलेला नाही चाचण्यांचा वेग वाढला की आजही कोरोना रुग्णांची जास्त नोंद होताना पहायला मिळत आहे. यातच अधुन मधुन मंकी पाॅक्सचे रुग्ण सापडत असल्याचे समोर येत आहे. स्वाईन फ्लू सारख्या आजारामुळे त्रस्त असलेल्या शेकडो रुग्णांवर उपचार सुरु आहेत. व्हायरलच्या साथीचेही असेच आहे. वेगवेगळ्या आजाराला सगळेच तोंड देत असताना लहान मुलांमधे टोमॅटो फ्लू नावाचा नवा आजार समोर आला आहे. लहान मुलांमधे या रोगाची साथ पहायला मिळत आ0हे. त्यामुळे पालकांना आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
काय आहे टोमॅटो फ्लूटोमॅटो फ्लू हा विषाणूजन्य संसर्गाचा एक सामान्य प्रकार असल्याचे सांगितले जाते, ज्यात पाच वर्षांखालील मुलांना ताप येतो. तसेच त्वचेवर पुरळ उठतात. फ्लूची लागण झालेल्या मुलांच्या शरीराच्या अनेक भागांवर फोड येतात, ज्याचा रंग सामान्यतः लाल असतो, म्हणून या आजाराला टोमॅटो फ्लू म्हणतात. सध्या केरळमधील कोल्लम जिल्ह्याच्या काही भागांमध्येच संसर्गाची नोंद झाली आहे, परंतु आरोग्य अधिकार्यांनी इशारा दिला आहे की जर उपाययोजना केल्या नाहीत तर संसर्ग इतर भागातही पसरू शकतो.
का होतो टोमॅटो फ्लूटोमॅटो फ्लूचे विशिष्ट कारण शोधण्यासाठी शास्त्रज्ञ अजूनही संशोधन करत आहेत. परंतु सध्या हा विषाणू संसर्गाचा एक प्रकार मानला जात आहे. डेंग्यू किंवा चिकुनगुनियाचा हा दुष्परिणाम असू शकतो, असेही काहींनी सुचवले आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्याचा स्रोत हा व्हायरस आहे. परंतु तो कोणत्या विषाणूमुळे पसरत आहे किंवा कोणत्या विषाणूशी संबंधित आहे याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.
संसर्ग होण्याची शक्यताकेरळ मधे आतापर्यंत या विषाणूचे अनेक रुग्ण आढळले आहेत. आसपासच्या भागातही काही मुलांना टोमॅटो फ्लूचा संसर्ग झाला आहे. ६ मे रोजी भारतात टोमॅटो फ्लूची लागण झालेला पहिला रुग्ण सापडला होता. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या ८२ मुलांना या आजाराचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वयोगटात व्हायरल इन्फेक्शन सामान्य आहे. तसेच इतरांच्या संपर्कात आल्याने या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. या आजारात हात, पाय आणि तोंडाच्या आजारासारखी लक्षणे दिसून येतात असेही तज्ञांनी म्हणले आहे.