अनेकदा असे घडते की, बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन गेल्यावर दुकानदार वर्तमानपत्रात गुंडाळून देतो. किंवा आपण स्वतः वर्तमानपत्रात अन्न पॅक करतो. जेव्हा जेव्हा आपल्याला नेण्यासाठी काही मिळत नाही, तेव्हा तेव्हा आपण ते वर्तमानपत्रातच गुंडाळतो. तुम्हीही कधी असे केले असेल किंवा वर्तमानपत्रात काहीतरी गुंडाळलेले खाल्ले (if you eat food in newspaper) असेल तर आताच सावध व्हा, असे करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. खरं तर, वर्तमानपत्रांमध्ये वापरल्या जाणार्या शाईमध्ये धोकादायक रसायने असतात. ज्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता. यामुळे अनेक प्रकारचे कर्करोग (Many types of cancer can occur देखील होऊ शकतात. Good Health . don't eat food in news paper
रसायनांमुळे नुकसान होऊ शकते :वास्तविक, वर्तमानपत्रांमध्ये वापरल्या जाणार्या शाईंमध्ये घातक रसायने असतात. या रसायनांचा आपल्या शरीरावर घातक परिणाम होतो. अलीकडेच, अन्न सुरक्षा नियामक (FSSAI) ने वर्तमानपत्रात गुंडाळलेले अन्न खाण्याची सवय लोकांसाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते. आज आम्ही तुम्हाला वर्तमानपत्रातील अन्न खाल्ल्याने कोणते आजार होऊ शकतात हे सांगणार आहोत.
यकृताचा कर्करोग :गरम अन्न वर्तमानपत्रात ठेवल्याने लोकांना यकृताचा कर्करोग होण्याचा धोका असतो. तसेच यकृताच्या कर्करोगासोबत मूत्राशयाचा कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो.