कोलकाता: बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची कोविड टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी मंगळवारी दिली. सोमवारी संध्याकाळी त्याची चाचणी पाॅझिटिव्ह आल्याने सौरववर वुडलॅंड हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.
Ganguly hospitalised : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली कोविड पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल - सौरव गांगुली कोविड पॉझिटिव्ह
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (BCCI president Sourav Ganguly) यांची कोविड टेस्ट पाॅझिटिव्ह (tests positive for Covid )आली आहे. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सौरव गांगुलीला या वर्षाच्या सुरवातीला 2 वेळा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऱ्हदया संबंधित आजारामुळे त्यांच्यावर एंजियोप्लास्टी शस्त्रक्रीया करण्यात आली होती. कोरोना पाॅझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांचे कोरोना सॅंपल जीनोम सिक्वेंसिंग साठी पाठवण्यात आले आहेत.
एंजियोप्लास्टी नंतर बरेच दिवस ते डाॅक्टरांच्या देखरेखीखाली होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट दुसऱ्यांदा पाॅझिटिव्ह आल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यांनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्यांचे मोठे भाऊ स्नेहाशीष गांगुली यांना पण कोरोना झाला होता.