महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Indian squad for T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप 2022 साठी टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळाली संधी

बीसीसीआयने ( BCCI ) 2022 च्या टी- 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा ( Indian squad for T20 World Cup announced ) केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बोर्डाने 15 सदस्यीय संघाची निवड केली आहे, जो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या मेगा स्पर्धेत खेळणार आहे.

Indian squad
भारतीय संघ

By

Published : Sep 12, 2022, 5:53 PM IST

Updated : Sep 12, 2022, 5:58 PM IST

नवी दिल्ली : आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 ( ICC T20 World Cup 2022 ) साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली ( Indian squad for T20 World Cup announced ) आहे. सोमवारी 12 सप्टेंबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI ) या मेगा स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. सोमवारी दुपारी निवड समितीची बैठक झाली, त्यात 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बहुराष्ट्रीय स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा आणि उपकर्णधार केएल राहुलकडे असणार आहे.

दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा ( Injured Ravindra Jadeja ) टी-20 विश्वचषकाच्या अंतिम 15 सदस्यीय संघाचा भाग नाही, पण चांगली गोष्ट म्हणजे संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतला ( Jasprit Bumrah returns to the team ) आहे. टी-20 विश्वचषक 2022 साठी निवडलेल्या 15 सदस्यीय संघात 13 खेळाडू असे आहेत, जे काही दिवसांपूर्वी आशिया कप 2022 च्या संघाचा भाग होते. आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी खराब झाली होती. ज्यामुळे संघाला अंतिम फेरी गाठता आली नाही.

टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ ( Indian squad for T20 World Cup ) पुढीलप्रमाणे -

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, वाय चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, बी. कुमार, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.

राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर

आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2022 ( ICC Mens T20 World Cup 2022 ) हा 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना रविवारी 23 ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. दोन्ही संघ गट 2 चा भाग आहेत. पाकिस्ताननंतर, भारताला दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश व्यतिरिक्त इतर दोन संघांशी सामना करायचा आहे, ज्यांची घोषणा गट टप्प्यातील सामन्यांनंतर केली जाईल.

हेही वाचा -Asia Cup 2022 : आशिया चषक श्रीलंकेच्या नावावर.. पाकिस्तानला चारली धूळ, २३ धावांनी केला पराभव

Last Updated : Sep 12, 2022, 5:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details