नवी दिल्ली- गुजरात दंगलीवर बनवलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संशयास्पद भूमिका दाखवली आहे. बीबीसी डॉक्युमेंटरीचा मुद्दा इमरान हुसैन यांनी ब्रिटीश संसदेत उपस्थित केला होता. त्यावर गुजरात दंगलीवर बनवलेल्या डाक्युमेंटरीशी सहमत नसल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही कोणाच्याही कैरेक्टेराइजेशनशी सहमत नसल्याचेही सुनक यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाखवले संशयास्पद भुमिकेत :पाक वंशाच्या खासदाराने संसदेत बीबीसीने गुजरात दंगलीवर बनवलेली डाक्युमेंटरीबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर ऋषी सुनक यांनी आम्ही कोणत्याही अन्याय अत्याचाराचे समर्थन करत नसल्याचे यावेळी स्पष्ट केले. मात्र आता जो मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला त्याच्याशी आपण सहमत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुशे ऋषी सुनक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव केल्याचेच म्हटले जाते.
इमरान हुसैन यांनी केले बीबीसी डाक्युमेंटरीचे समर्थन :बीबीसी डॉक्यूमेंट्रीचे पाकिस्तानी वंशाचे खासदार इमरान हुसैन यांनी समर्थन केले होते. त्यावर ऋषी सुनक यांनी स्पष्ट भुमीका घेतली. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव केला. बीबीसी डॉक्युमेंटरीपासून त्यांनी स्वतःला दूर केले. डाक्युमेंटरीमध्ये चित्रण केलेल्या व्यक्तीरेखेशी ते सहमत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी ब्रिटनच्या संसदेत मांडलेल्या बीबीसीच्या डाक्युमेंटरी सुनक यांनी भाष्य केले.