कोलकाता - संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. बंगालच्या विधानसभा निवडणुकीत नंदिग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भारतीय जनता पार्टीने विद्यमान आमदार सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली. हा मतदारसंघ सुवेंदू अधिकारी यांचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने आता येथे ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी यांच्यात थेट लढत होत आहे.
बंगालमध्ये ममतांना सत्तेत आणण्यात नंदीग्राम मतदारसंघाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तर ममतांचे सेनापती म्हणून सुवेंदू यांची ओळख होती. दीदींचे उत्तराधिकारी असेही सुवेंदू यांना म्हटलं जात. मात्र, ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या उदयानंतर तृणमूलमध्ये त्यांचे महत्त्व कमी झाले. यावर ते नाराज होते. अखेर टीएमसीला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपात प्रवेश केला. यानंतर तृणमूलने त्यांना गद्दार असेही संबोधले.
दीदींनी डाव्याची सत्ता उलथली -
ममता बॅनर्जी यांच्या 'मां, माटी आणि मानुष' या मोहीमेलाही येथून 2007 मध्ये सुरुवात झाली होती. औद्योगिकरणासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात रक्तपात झालेल्या नंदीग्राममध्ये आज जातीय आधारावर ध्रुवीकरण केलेले दिसते आहे. 'तोमर नाम, अमर नाम' नंदीग्राम, नंदीग्राम (तुझे नाव, माझे नाव नंदिग्राम, नंदीग्राम) ही घोषणा तेव्हा गाजत होती. आता इथे 'जय श्री राम' नारे दिले जात आहेत. विशेष आर्थिक क्षेत्र तयार करण्यासाठी राज्यातील तत्कालीन डाव्या सरकारने केलेल्या जमीन संपादनाच्या विरोधात 2007 मध्ये उग्र आंदोलन झालं होतं. जमीन अधिग्रहणाविरोधात आंदोलन करुन बॅनर्जी यांनी राज्यात 34 वर्षांच्या डाव्या राजवटीचा पराभव करून सत्ता काबीज केली होती.
नंदीग्राममध्ये आज जातीय आधारावर ध्रुवीकरण -