महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Two Girl Love Story : दोन तरुणींमध्ये जडले प्रेम, एकीने बदलले लिंग अन्.... - दोन तरुणींचे प्रेम

प्रेम कोणावरही आणि कधीही होऊ शकते याचे एक उत्तम उदाहरण बरेलीमध्ये समोर आले आहे. येथे राहणाऱ्या दोन तरुणींचे एकमेकींवर प्रेम (Two Girl Love Story) जडले. आता या दोघींनीही लग्न करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

Etv Bharat
फाईल फोटो

By

Published : Jul 13, 2023, 3:16 PM IST

बरेली (उत्तर प्रदेश) -खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या दोन तरुणींची सुरुवातीला मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पण दोघीही तरुणी असल्याने लग्नासाठी (Two Girl Love Story) अनेक अडचणी येत आहेत. यातील एका तरुणीने लग्नासाठी लिंगसुद्धा बदलले आहे. लग्नाला या दोघींच्याही कुटुंबियांचा विरोध आहे.

प्रकरण कोर्टात - दोंघींमधील एका तरुणींने लिंग बदलेल आहे. त्यानंतर बरेली येथील एसडीएम कोर्टात नोंदणीसाठी अर्ज केला आहे. एसडीएमने या प्रकरणी सरकारी वकिलांचे मत मागवले आहे. त्यानंतर या दोघींच्या लग्नाचा मार्ग मोकळा होणार आहे.

तरुणींचे एकमेकींवर जडले प्रेम - बरेलीमध्ये खासगी नोकरी करणाऱ्या दोन तरुणींच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनीही पती-पत्नी म्हणून आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला. यातील एक तरुणी बदाऊनची, तर दुसरी तरुणी ही बरेलीची राहणारी असल्याचे सांगण्यात येत आहे. लग्नसाठी या दोघींच्या कुटुंबियांनी विरोध सुरू केला होता. मात्र, हा विरोध न जुमानता या दोघी तरुणींनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

तरुणीने बदलले लिंग -दोन तरुणींपैकी एका तरुणीने गुंतागुंतीची वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिचे लिंग बदलून घेतले आहे. यानंतर दोघांनीही बरेली येथील एसडीएम कोर्टात विवाह नोंदणीसाठी अर्ज केला आहे. विवाह नोंदणीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर एसडीएम सदर प्रत्युष पांडे यांनी या प्रकरणी सरकारी वकिलांकडून कायदेशीर मत मागवले आहे.

कायदेशीर प्रक्रिया सुरू - स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत अर्ज आला होता. त्यानुसार येथे कोणाला लग्नाची नोंदणी करायची असेल तर तो एसडीएमकडे अर्ज देऊ शकतो. या प्रकरणात लिंग बदलल्यानंतर अर्ज आला आहे, त्यामुळे कायदेशीर मत मागवण्यात आले आहे. असा प्रकार पहिल्यांदाच आपल्यासमोर आला आहे, त्यामुळे यातील कायदेशीर नियम काय आहे आणि नियमानुसार जे होईल ते जाणून घ्यायचे आहे. या प्रकरणात एक तरुणी बरेलीची तर दुसरी बरेली बाहेरची असल्याची माहिती एसडीएम सदर प्रत्युष पांडे यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Counselling In love : 'प्रेमातील वाढते हल्ले रोखण्यासाठी समुपदेशन ही काळाची गरज'
  2. love relationship break up : प्रेम संबंध तोडल्याने विवाहित महिलेने पुण्यातून केले तरुणाचे अपहरण

ABOUT THE AUTHOR

...view details