डेहराडून - बद्रीनाथ धामाचे दरवाजे आज 3 वाजून 35 मिनिटांनी बंद करण्यात आले आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळी हंगामामुळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येतात. दरवाजे बंद झाल्यानंतर प्रशासकीय परवानगीशिवाय हनुमान चट्टीच्या पुढे जाण्याची परवानगी नसते.
बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे 15 मेला उघडण्यात आले होते. आद्य शंकराचार्य यांनी 9व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.