महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Arrest LeT Terrorist In Baramulla : एलईटी संघटनेच्या एका दहशतवाद्याला बारामुल्ला पोलिसांकडून अटक - दहशतवाद्याला बारामुल्ला भागात अटक

जम्मू आणि काश्मी येथे बारामुल्ला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथे एलईटी संघटनेच्या एका दहशतवादी सहकाऱ्याला काल, रविवार (८ मे)रोजी अटक केली आहे. ( Baramulla police took major action ) फ्रस्थर क्रेरी बारामुल्ला येथे ही अटक करण्यात आली. एजाज

Arrest LeT Terrorist In Baramulla
Arrest LeT Terrorist In Baramulla

By

Published : May 9, 2022, 7:06 AM IST

बारामुल्ला (जम्मू -काश्मी) - जम्मू आणि काश्मी येथे बारामुल्ला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथे एलईटी संघटनेच्या एका दहशतवादी सहकाऱ्याला काल, रविवार (८ मे)रोजी अटक केली आहे. ( Baramulla police took major action ) फ्रस्थर क्रेरी बारामुल्ला येथे ही अटक करण्यात आली. एजाज अहमद मीर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, त्याच्याकडून पिस्तूलासह दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. तसेच, येथील क्रेरी पोलीस ठाण्यात (UAPA)आणि (IA)कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती बारामुल्ला पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्रीरी भागात आतंकवादी येत आहेत अशी एक सुचना मिळाली होती. त्याचा आधार घेत सुरक्षा दलाने एक टीम येथे तपासासाठी गेली होती. ( Baramulla police arrest LeT terrorist ) या तपासावेळी एक व्यक्ती येथील फ्रास्टर क्षेत्रात संशयास्पद फिरताना आढळला. त्यावेळी त्याकडे सुरक्षा दलाने धाव घेतली तेव्हा तो पळाला. मात्र, सुरक्षा दलाने त्याचा पाटला करून त्याला ताब्यात घेण्यात यश मिळवले. अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details