महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Eight Died In Barabanki Road Accident : उत्तरप्रदेशात बाराबंकी येथे डबलडेकर बसला भिषण अपघात, आठ ठार - Eight Died

बाराबंकी येथे सोमवारी डबलडेकर बसचा भिषण अपघात ( Barabanki Road Accident ) झाला. या अपघातात 8 जणांचा मृत्यू ( Eight Died ) झाला. या अपघातात 15 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. लोणी कटरा पोलीस स्टेशनच्या त्रिवेदी गंज भागातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.

Barabanki Road Accident
Barabanki Road Accident

By

Published : Jul 25, 2022, 10:32 AM IST

बाराबंकी येथे सोमवारी डबलडेकर बसच्या भिषण अपघातात ( Barabanki Road Accident ) आठ जणांचा मृत्यू ( Eight Died ) झाला आहे. 15 हून अधिक प्रवासी या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. लोणी कटरा पोलीस स्टेशनच्या त्रिवेदी गंज भागातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. दोन बसची धडक झाल्याने हा अपघात घडला.

उत्तरप्रदेशात बाराबंकी येथील अपघातात आठ ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारमृतांमध्ये 1 महिला, एक 14 वर्षांचा मुलगा आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. ही डबल डेकर बस बिहारहून दिल्लीला येत होती. गंभीर जखमी झालेल्या १३ जणांना हैदरगढ सामुदायिक आरोग्य केंद्रातून लखनौला पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

राजधानी लखनौपासून27 किमी अंतरावर असलेल्या बाराबंकी येथील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर डबल डेकर बसचा हा अपघात झाला. या अपघातात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. लोणी कटरा पोलीस स्टेशनच्या त्रिवेदी गंज परिसरात हा अपघात झाला. दोन बसच्या धडकेने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details