हैदराबाद -ऑगस्ट महिन्यासाठी राष्ट्रीय अथवा प्रादेशिक सण आणि विशेष पाळण्यात येणाऱ्या दिवसांसाठी बँका कोणत्या दिवशी बंद राहणार आहेत, याची यादी आता भारतीय रिझर्व्ह बँकेने ( आरबीआय ) जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यात तब्बल 10 दिवस ( दुसरा/चौथा शनिवार आणि रविवार सोडून ) देशाच्या काही भागांमध्ये बँकांना सुट्टी राहणार ( Bank Holidays August 2022 )आहे.
बँकांना सुट्टी देण्यात आली असली तरी ऑनलाईन वित्तीय सेवा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत होणारी गैरसोय टाळण्यासाठी तुम्हाला बँकेशी संबंधित सर्व कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त देशात बँका बंद राहणार आहेत. त्याचसोबत अन्य प्रादेशिक सुट्ट्यांमध्ये गणेश चतुर्थी, जन्माष्टमी, शहेनशाह आणि मोहरमचा समावेश आहे.