ढाका Bangladesh Poll :बांगलादेशात आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीत बांगलादेशातील विरोधी पक्ष असलेल्या बीएनपीनं निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळं निवडणुकीत एकूण 27 पक्ष किल्ला लढवत आहेत. या निवडणुकीत बांगलादेशातील नेत्या शेख हसीना पुन्हा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आज सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
आज सकाळी झाली मतदानाला सुरुवात :बांगलादेशात आज सकाळी 8 वाजता सार्वत्रिक मतदानाला सुरुवात झाली. या निवडणुकीत एकूण 27 पक्ष मैदानात उतरले आहेत. मात्र बांगलादेशच्या नेत्या शेख हसीना यांना या निवडणुकीत यश मिळेल, असा त्यांच्या अवामी लिगला खात्री असल्याची सूत्रांनी माहिती दिली.
आज 42 हजार मतदान केंद्रावर होणार मतदान :बांगलादेशात आज होणाऱ्या निवडणुकीत 119.6 मिलियन नागरिक मतदान करणार आहेत. बांगलादेशातील 42 हजार मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. 300 पैकी 299 मतदार संघात मतदान होणार आहे. एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यानं एका मतदार संघात निवडणूक होणार नाही. या मतदार संघात होणारी निवडणूक नंतर घेण्यात येणार असल्याचं बांगलादेशच्या निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.
शेख हसीना यांना पुन्हा विजय मिळवण्याची अपेक्षा :बांगलादेशच्या नेत्या शेख हसीना यांच्या अवामी लिग पक्षानं या निवडणुकीत मोठी तयारी केली आहे. या निवडणुकीत 436 अपक्ष उमेदवारांसह 27 राजकीय पक्षांचे 1 हजार 500 पेक्षा अधिक उमेदवार निवढणूक लढवत आहेत. या निवडणुकीचा निकाल 8 जानेवारीला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेख हसीना 2018 पासून बांगलादेशात सत्तेवर आहेत.
हेही वाचा :
- Bangladesh PM Sheikh Hasina is Visit to India : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत दौऱ्यावर; राष्ट्रपती भवनात जोरदार स्वागत
- बांगलादेश निवडणूक; पंतप्रधान शेख हसीना यांचं भवितव्य पणाला, ७ जानेवारीला मतदान
- Sheikh Hasina: बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी केले कलाकारांसोबत नृत्य; पाहा व्हिडिओ