बेंगळुरू (कर्नाटक) : गार्डन सिटी आणि आयटी सिटी यासह बेंगळुरू हे ट्रॅफिक सिटी म्हणून ओळखल्या ( Traffic Control With Google ) जाते. त्यामुळे बेंगळुरूमधील ट्रॅफिकचे व्यवस्थापन करण्यासाठी देशात प्रथमच शहरातील वाहतूक पोलिसांनी गुगलशी हातमिळवणी केली आहे. यापुढे वाहन चालकांना वेगमर्यादा आणि वाहतूक कोंडीचे मार्ग गुगल मॅपद्वारेच कळतील.
यासाठी होणार उपयुक्त - वाहतुकीची कोंडी असलेले रस्ते आणि बांधकामामुळे वाहतुकीवर निर्बंध असलेले रस्ते यांची माहिती गुगलच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करणे उपयुक्त ठरेल. त्यामुळे अनावश्यक वाहतूक कोंडी, प्रतीक्षा वेळ, इंधनाचा वापर टाळता येईल.