महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्नाटकात वाघाचे तीन बळी; बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

गेल्या १५ दिवसांमध्ये वाघाच्या हल्ल्यात तब्बल तीन जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे, तातडीने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तीन आठवड्यांपासून वन विभागाचे सुमारे १०० कर्मचारी या वाघाचा शोध घेत आहेत..

Bandh in Kodagu's Ponnampet, Farmers Union demand killing of the tiger
कर्नाटकात वाघाचे तीन बळी; बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

By

Published : Mar 11, 2021, 5:50 PM IST

बंगळुरू : कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यामध्ये वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी एक दिवसाचा बंद घोषित करण्यात आला होता. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या बंदला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. गेल्या १५ दिवसांमध्ये वाघाच्या हल्ल्यात तब्बल तीन जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे, तातडीने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

आठ वर्षांच्या मुलाचा मृत्यू..

कोगडू जिल्ह्यातील श्रीमंगल होबळी तालुक्यातील बेल्लुरमध्ये एक आठ वर्षाचा मुलगा आणि त्याच्या आजोबांवर वाघाने हल्ला केला होता. यामध्ये या मुलाचा मृत्यू झाला, तर आजोबा गंभीर जखमी झआले. रंगास्वामी असे या मुलाचे, तर केंचा असे त्याच्या आजोबांचे नाव होते. जखमी केंचांवर म्हैसूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शोध सुरू..

गेल्या तीन आठवड्यांमध्ये वाघाच्या हल्ल्यात झालेला हा तिसरा मृत्यू होता. यामुळे नागरिकांमधून प्रशासनाविरोधात मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करत या वाघाला ठार मारावे अशी मागणी स्थानिक करत आहेत. गेल्या १५ दिवसांपासून वन विभागाचे सुमारे १०० कर्मचारी या वाघाचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :'भारत आता लोकशाही राष्ट्र राहिले नाही'; राहुल गांधींचे ट्विट

ABOUT THE AUTHOR

...view details