महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rohini Theatre Issue : नारीकुरुवर आदिवासींना चित्रपट पाहण्याची परवानगी नाकारली, थिएटर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

चेन्नईतील रोहिणी थिएटरमध्ये नारीकुरुवर समाजातील लोकांना चित्रपट पाहण्याची परवानगी नाकारल्याप्रकरणी पोलिसांनी दोन थिएटर कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपी आणि पीडितांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.

Rohini Theatre Issue
रोहिणी थिएटर वाद

By

Published : Mar 31, 2023, 8:07 AM IST

चेन्नई : सिम्बू अभिनीत बटू थाला चित्रपट काल (30 मार्च) प्रदर्शित झाला. चित्रपट पाहण्यासाठी सकाळीच चेन्नईतील विविध चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांनी गर्दी केली होती. नारीकुरुवर समाजातील 15 लोकही हा चित्रपट पाहण्यासाठी चेन्नई येथील रोहिणी थिएटरमध्ये गेले होते. त्यावेळी तिकीट तपासणाऱ्या थिएटर कर्मचाऱ्याने नारीकुरुवर समाजातील लोकांना तिकीट असूनही आत जाऊ दिले नाही.

Rohini Theatre Issue

अस्पृश्यतेमुळे परवानगी नाकारली : याबाबत नारीकुरुवर समाजातील महिलांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतरही त्यांना परवानगी देण्यात आली नाही. यानंतर कर्मचारी आणि या महिलांमध्ये वाद झाला. तिथल्या एका व्यक्तीने घटनेचा व्हिडिओ काढून तो फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट केला. अस्पृश्यतेमुळे त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. झालेल्या घटनेनंतर रोहिणी थिएटरने स्पष्ट केले की, 'पथू थाला' या चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र मिळाल्यामुळे मुलांना प्रवेश नाकारण्यात आला होता. परंतू नारीकुरुवर समाजातील लोकांना चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये परवानगी देण्यात आली होती. हे प्रकरण वादग्रस्त ठरल्याने सीएमबीटी पोलिसांनी रोहिणी चित्रपटगृहात जाऊन थिएटर मालक आणि तिकीट तपासनीस यांची कसून चौकशी केली.

सिम्बू फॅन क्लबच्या सदस्यांनी दिली होती तिकिटे :शहरातील फ्लायओव्हरखाली नारीकुरुवर समाजाचे लोक राहतात. तपासात समोर आले की, त्यांना सिम्बू फॅन क्लबच्या सदस्यांनी मोफत तिकिटे दिली होती. तिकीट तपासनीस कुमारेसन यांनी मुले उपस्थित असल्याने त्यांना आत प्रवेश दिला नसल्याचे आढळून आले. नडलकराईचे जिल्हाधिकारी माधवन यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन थिएटर मालक व कर्मचाऱ्यांची चौकशी केली.

आरोपींवर गुन्हा दाखल : या प्रकरणी कावेरी या पीडित महिलेने सीएमबीटी पोलिस ठाण्यात सिनेमागृहात प्रवेश न दिल्याबद्दल तक्रार दाखल केली. त्या आधारे पोलिसांनी रोहिणी थिएटरचे रोखपाल रामलिंगम (50) आणि कोईम्बतूर येथील कर्मचारी कुमारेसन (36) यांच्याविरुद्ध अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला. अन्ननगर पोलीस जिल्हा अंतर्गत सहाय्यक आयुक्त रमेश बाबू यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिस विभागातील सूत्रांनी सांगितले की, पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपी आणि पीडितांना चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे.

हेही वाचा :Kerala Crime News : परप्रांतीय कामगारांमध्ये संघर्ष, केरळमध्ये सहा वर्षांच्या मुलाची चाकूने भोसकून हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details