अहमदाबाद- सुरत शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी ( Balloons and flags will be ban in Surat ) सुरत महानगरपालिकेने प्लास्टिकच्या वापराबाबत नवे धोरण ( Surat Municipal corporation Plastic Policy ) जाहीर केले आहे. या धोरणानुसार प्लास्टिकच्या वापराबाबत कडक नियमांचे पालन होणार आहे.
31 डिसेंबरपासून सुरतमध्ये प्लास्टिकचे झेंडे, आईस्क्रीमची काडी, प्लास्टिकचे फुगे आणि प्लास्टिकचे कप विकण्यावर बंदी लागू होणार आहे. 2018 मध्ये 50 मायक्रॉनहून कमी असलेल्या प्लास्टिक बॅगसहित विविध वस्तुंच्या वापरावर बंदी लागू होणार आहे. वर्ष 2021 मध्ये 75 मायक्रॉनहून कमी असलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तुंवर बंदी लागू करण्यात आली होती. नव्या आदेशानुसार 120 मायक्रोनहून कमी असलेल्या प्लास्टिकच्या बॅग आणि वस्तुवर बंदी लागू होणार आहे.
हेही वाचा-शाळेला सुट्टी मिळावी म्हणून वसतीगृहातील 20 मित्रांना पाजले कीटकनाशक