बालाघाट (मध्य प्रदेश) - आजपर्यंत तुम्ही सायकल, मोटारसायकल किंवा चारचाकीने शाळेत जाणारे विद्यार्थी पाहिले असतील, पण आज आपण अशा एका विद्यार्थ्याला भेटणार आहोत जो राजा महाराजांसारखी घोडेस्वारी करत शाळेत पोहचतो! होय हे खरं आहे. बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी आदिवासी झोन गावातील इयत्ता सहावीचा विद्यार्थी ललित कुमार कडोपे (Balaghat student Lalit Kumar) शाळेत जाण्यासाठी दुचाकी किंवा चारचाकी वाहन न वापरता चक्क घोडा वापरतो! (student goes to school by horse).
शाळेत जाण्यासाठी खडतर रस्ता - गरीब कुटुंबातील ललित हा सरकारी माध्यमिक विद्यालय खैरलांजी येथे इयत्ता सहावीचा विद्यार्थी असून तो आपल्या आजी-आजोबांच्या घरी शिकतो आहे. नानिहाल ते शाळेचे अंतर 4 किलोमीटर आहे. वाटेत रस्ता नाही, पण अभ्यासासाठी दररोज 4 किलोमीटर जाणे आणि परत येणे हा विद्यार्थी ललितसाठी खडतर प्रवास होता. अभ्यास करून पुढे जाण्याची विद्यार्थ्याची इच्छा असल्याने ही अडचण त्याला दूर करायची होती. त्याच्या मामाच्या घरी घोडा होता. त्यामुळे ललितने शाळेत जाण्यासाठी घोड्याचाच उपयोग करण्याचे ठरवले.