बेलग्रेड : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनियाने ( Olympic bronze medalist Bajrang Punia ) जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. पुनियाने 0-6 ने पुनरागमन करत पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिवेराला 11-9 ने पराभूत करून पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात कांस्यपदक ( Bajrang Punia Defeating Sebastian Rivera ) जिंकले. जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचे हे दुसरे पदक आहे. याआधी महिला कुस्तीपटू विनेश फोगटने कांस्यपदक जिंकले होते.
तत्पूर्वी, बजरंगला ( Wrestler Bajrang Punia ) उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉन डायकोमिहलिसने पराभूत केले होते. त्यानंतर बजरंगने रेपेचेजच्या माध्यमातून कांस्यपदकाचा सामना गाठला आणि जिंकला. रेपेचेजच्या पहिल्या सामन्यात बजरंगने आर्मेनियाच्या वेगेन टेवान्यानचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. बजरंगने पहिल्याच सामन्यात डोक्याला दुखापत झालेल्या दुखापती सोबत मोहिमेला सुरुवात केली होती.