महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ADGP Amrit Paul bail rejected: एडीजीपी अमृत पॉल यांचा जामीन अर्ज फेटाळला - एडीजीपी अमृत पॉल

एडीजीपी अमृत पॉल (IPS) यांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी जामीन नाकारला आहे. न्यायदंडाधिकारी आनंद टी चौहान यांनी जामीन अर्ज फेटाळला कारण तपास अद्याप सुरू आहे. घोटाळ्यात त्यांच्यावर गंभीर आरोप केले गेले आहेत (IPS) .

एडीजीपी अमृत पॉल यांचा जामीन अर्ज फेटाळला
एडीजीपी अमृत पॉल यांचा जामीन अर्ज फेटाळला

By

Published : Jul 26, 2022, 11:06 AM IST

बेंगळुरू: पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती घोटाळ्यातील आरोपी असलेले सर्वोच्च पदावरील अधिकारी, एडीजीपी अमृत पॉल (IPS) यांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांनी जामीन नाकारला आहे. न्यायदंडाधिकारी आनंद टी चौहान यांनी जामीन अर्ज फेटाळला कारण तपास अद्याप सुरू आहे. घोटाळ्यात त्यांच्यावर गंभीर आरोप केले गेले आहेत.

पॉल हे एडीजीपी (Recruitment) होते आणि या प्रकरणातील ते 35 वे आरोपी आहेत. या खटल्यातील विशेष सरकारी वकील पी प्रसन्न कुमार यांनी युक्तिवाद केला होता की आयपीएस अधिकाऱ्याने गंभीर गुन्हा केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याला जामिनावर सोडणे चुकीचे संकेत देईल. 542 पीएसआयच्या भरतीमध्ये लाच आणि उत्तरपत्रिकांमध्ये छेडछाड केल्याच्या आरोपांमुळे परीक्षा रद्द झाल्या आहेत. या प्रकरणी अनेक उमेदवार आणि पोलिस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - Home Guard Raped RTA Employee: होमगार्डचा परिवहन कर्मचारी महिलेवर बलात्कार, 4 वर्षे अत्याचार करुन 50 लाखांची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details