चमोली - दिवे आणि रंगीबेरंगी रोषणाईने सजलेल्या सुवर्णमंदिराचा दिवाळी सणात वेगळाच थाट पाहायला मिळतो. बद्रीनाथ धामाचे विशाल मंदिर भव्य पद्धतीने सजवले आहे. दरवर्षी दीपावलीच्या उत्सवात मंदिर झेंडूच्या फुलांनी सजविले जाते. मंदिर परिसरातील माता लक्ष्मी मंदिरात दीपावलीच्या उत्सवावर विशेष पूजा केली जाते. दीपोत्सवही बद्रीनाथ मंदिरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी 19 नोव्हेंबरला बद्रिनाथ मंदिराचे दरवाजे बंद होत आहेत.
बद्रीनाथ मंदिरात दिवाळी उत्सव हिवाळ्यात मंदीराचे दरवाजे असतात बंद
12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळ्यात भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येतात. आद्य शंकराचार्य यांनी 9व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.
अलकनंदा नदीच्या काठावर वसलेलं मंदिर -
बद्रीनाथ मंदिर हे देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ गावामधील एक विष्णूचे हिंदू मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी बद्रीनाथ मंदिर एक आहे. समुद्रसपाटीपासून 3,133 मी (10,279 फूट) उंचीवर वसले आहे. उत्तराखंडच्या चमोली जिह्यात अलकनंदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर केवळ काही महिने दर्शनासाठी खुले असते.