महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

खराब हवामानामुळे कस्तुरीच्या 'मिशन एव्हरेस्ट' मध्ये अडथळा - यास इफेक्ट

खराब हवामानामुळे कस्तुरीच्या 'मिशन एव्हरेस्ट' मध्ये अडथळा येत आहे. वेगाने वाहणारे वारे आणि बर्फवृष्टीमुळे कोल्हापुरची कन्या कस्तुरी सावेकर तिसऱ्या कॅम्प वरून दुसऱ्या कॅम्प वर परतली आहे.

कोल्हापूरची कस्तुरी सावेकर
कोल्हापूरची कस्तुरी सावेकर

By

Published : May 28, 2021, 8:07 AM IST

कोल्हापूर: खराब हवामानामुळे मिशन एव्हरेस्ट मोहिमेत मोठा अडथळा निर्माण होत आहे. 26 ते 28 मे ही वेदर विंडो (अनुकूल वातावरणाची) चढाईसाठी पूरक होते. मात्र, आता यास चक्रीवादळामुळे इथल्या हवामानात मोठा बदल झाला आहे. वेगाने वाहणारे वारे आणि बर्फवृष्टीमुळे कोल्हापुरची कन्या कस्तुरी सावेकर तिसऱ्या कॅम्प वरून दुसऱ्या कॅम्प वर परतली आहे. त्यामुळे तिच्यासोबत असलेले अन्य गिर्यारोहक सुद्धा आता अनुकूल वातावरणाच्या प्रतीक्षेत आहेत.

खराब हवामानामुळे कस्तुरीच्या 'मिशन एव्हरेस्ट' मध्ये अडथळा

कॅम्प दोन वर सुद्धा आता प्रचंड वारा; बर्फवृष्टी; टेन्टसह कपडेही झाले ओले

मिळालेल्या माहितीनुसार, बेसकॅम्प दोन वर सुद्धा आता प्रचंड बर्फवृष्टी, पाऊस तसेच प्रचंड वारा वहात आहे. सध्याची परिस्थिती फारच बिकट झाली असून 50 फूटाच्या पुढचे काहीही दिसत नाहीये. सर्वांचेच टेन्ट ओले झाले आहेत तर कपडेही ओले झाले आहेत. कपडे वाळण्यासाठी कोणताही पर्याय नाहीये. एव्हढेच नाही तर खाण्याचे साहित्य सुद्धा संपत आले आहे. बर्फवृष्टीमुळे बेसकॅम्प वरून खाण्याचे साहित्य वर येऊ शकत नाहीये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकवेळा हेलिकॉप्टर द्वारे ऑक्सिजन सिलेंडर सुद्धा मागविण्यात आले आहे. खरंतर एव्हरेस्ट मोहीम ही नेहमीच हवामानावर अवलंबून राहिली आहे. बहुतांश मोहिमांमध्ये अशाच पद्धतीने अडथळे निर्माण होत असतात. मात्र 'यास' वादळाच्या प्रभावामुळे इथले वातावरण खूपच बिघडले असल्याची माहिती मिळाली आहे. अशा या बिकट परिस्थितीत कोल्हापूरची कन्या कस्तुरी सावेकर हिच्यासह अन्य गिर्यारोहक वेदर विंडो (अनुकूल वातावरणाची) मिळेल अशी आशा बाळगुन हिम्मत न हारता चढाईची वाट पहात आहेत.

कॅम्पवर झालेली बर्फवृष्टी
बर्फवृष्टीमुळे टेन्टसह कपडेही झाले ओले

भल्या भल्यांना जमत नाही ते कस्तुरी करून दाखवतेय

एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान आता हवामान इतके खराब झाले आहे की, त्याठिकाणी बर्फवृष्टीसह प्रचंड वेगाने वारे वाहू लागले आहेत. सद्या सर्व गिर्यारोहक कॅम्प दोन वर आले आहेत. यामध्ये विशेष म्हणजे कोल्हापूरची कस्तुरी वयाने सर्वात लहान आहे. मंगळवारी 25 मे रोजी कस्तुरी 25 हजार फूट उंचीवरील कॅम्प तीन वरून कॅम्प चार कडे जाण्यासाठी चढाई करत होती. मात्र खराब हवामानामुळे त्यांनी पुन्हा कॅम्प तीन वर परत येण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी सुद्धा हवामान प्रचंड खराब झाल्याने काल 26 मे रोजी कस्तुरी पुन्हा कॅम्प दोन वर परत आली आहे. आता तिच्यासह सर्वच गिर्यारोहक चढाईसाठी अनुकूल वातावरणाची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे वाऱ्याशी सामना करून चढाई करणे. तसेच तीन रात्र तिथे राहून, खराब हवामानामुळे पुन्हा खाली येऊन तीन दिवस राहणे. तसेच पूढील चढाई साठी मानसिक व शारीरीक ताकदीने तितकेच फिट राहणे. भल्या भल्या गिर्यारोहकांना जमत नाही. मात्र कोल्हापुरची कस्तुरी अगदी संयमांने आणि तेव्हढ्याच आत्मविश्वासाने सर्व परिस्थितीशी सामना करत वेदर विंडोची (अनुकूल वातावरणाची) वाट पहात आहे. दरम्यान, संपूर्ण कोल्हापुरकरांच्या नजरा कस्तुरीच्या मिशन एव्हरेस्टकडे लागून राहिल्या आहेत.

खाण्याचे साहित्य सुद्धा संपत आले

हेही वाचा -दिलासादायक..! रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्क्यांवर, 21 हजार 273 नवे रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details