महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बाबुल सुप्रियोंंनी बदलले राजकारणाचे सूर; अचानक घेतला तृणमुलमध्ये पक्षप्रवेश

बाबुल सुप्रियो यांनी राजकारणामधून संन्याश घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, अचानक त्यांनी आज तृणमुलमध्ये प्रवेश केला आहे. काय आहे. काय घडले नेमके प्रकरण, वाचा.

बाबुल सुप्रियो
बाबुल सुप्रियो

By

Published : Sep 18, 2021, 3:54 PM IST

कोलकाता -पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. भाजपचे माजी खासदार, गायक तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

तृणमुलचे महासचिव अभिषेक बॅनर्जी आणि तृणमुलचे राज्यसभा खासदार डिरेक ओ ब्रायन यांनी बाबुल सुप्रियो यांचे पक्षात स्वागत केले आहे. त्यांनी तृणमुलमध्ये प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा-पंजाबचे कॅप्टन मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत; काँग्रेस हायकमांडचे आदेश!

राजकीय संन्याशाची केली होती घोषणा

पश्चिम बंगालमधील भाजपचे खासदार तथा गायक बाबूल सुप्रियो यांनी 1 ऑगस्ट 2021 रोजी राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते. आई-वडील, पत्नी, मित्र यांचा सल्ला घेतल्यानंतर राजकारण सोडण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. बाबूल सुप्रियो यांचा राजकारणातून संन्यास हा भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातो आहे. फेसबुकवर भलीमोठी पोस्ट लिहित बाबुल सुप्रियो यांनी राजीनामा देत असल्याचे सांगत मन मोकळे केले होते.

हेही वाचा-डिजीटल इंडिया अभियान: रेशन कार्डाशी संबंधित 'या' सेवा सेतू सुविधा केंद्रात मिळणार

कोण आहेत बाबुल सुप्रियो?

2014 सालापासून नरेंद्र मोदी सरकारमध्ये निरनिराळ्या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. ते दोन वेळा आसनसोलचे खासदार राहिले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते तृणमूलचे अरूप विश्वास यांच्याकडून पराभूत झाले होते. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळाच्या झालेल्या विस्तारात त्यांना वगळण्यात आले. यावेळी भाजपा खासदार बाबुल सुप्रियो यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर त्यांनी फेसबूक पोस्ट लिहून आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या.

हेही वाचा-गावकऱ्यांची चिंता मिटणार, आता ATM मधूनही औषधं मिळणार

ABOUT THE AUTHOR

...view details