महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'दंगल गर्ल' बबिता फोगटच्या बहिणीची आत्महत्या - 'दंगल गर्ल' बबिता फोगट

कुस्तीपटू बबिता फोगटच्या मामेबहिणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. भरतपुरमध्ये आयोजीत कुस्ती स्पर्धेत पराभव झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बबिता फोगट
बबिता फोगट

By

Published : Mar 17, 2021, 12:20 PM IST

Updated : Mar 17, 2021, 12:34 PM IST

नवी दिल्ली - कुस्तीपटू बबिता फोगटच्या मामेबहिणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. भरतपुरमध्ये आयोजित कुस्ती स्पर्धेत पराभव झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रितिका असे तिचे नाव आहे. सोमवारी महाबीर फोगाट यांच्या गावातील घरी गळफास घेत आत्महत्या केली.

महाबीर फोगाट यांनी दिलं होत प्रशिक्षण -

रितिका कुस्तीपटू महाबीर फोगट यांच्या अकादमीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून प्रशिक्षण घेत होती. रितिकाने 12 ते 14 मार्च दरम्यान भरतपूर येथील राज्यस्तरीय उप-कनिष्ठ, कनिष्ठ महिला व पुरुष कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. या दरम्यान 14 मार्च रोजी झालेल्या अंतिम सामन्यात रितिकाला एका गुणाने पराभव पत्करावा लागला. या सामन्यावेळी तेथे महाबीर फोगटही उपस्थित होते.

पराभवानंतर रितिका शॉकमध्ये होती -

सामन्यात झालेल्या पराभवानंतर रितिका धक्का लागला, असल्याचे सांगण्यात येत आहे. 15 मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास महाबीर फोगाट येथील बलाली गावातील घराच्या खोलीत पंख्याला गळफास घेत तीने आत्महत्या केली.

मंगळवारी अंतिम संस्कार पार पडले -

शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. राजस्थानातील झुंझुनू जिल्ह्यातील जैतपूर या गावी तीच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

हेही वाचा -हिमाचल प्रदेशचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू

Last Updated : Mar 17, 2021, 12:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details