सोनीपत :कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यातील वाद अधिकच विकोपाला गेला आहे. 3 महिने उलटूनही निकाल न लागल्याने कुस्तीपटू पुन्हा एकदा जंतरमंतरवर धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कायदेशीर कारवाईसह त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र या समितीची सदस्य असलेली आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बबिता फोगटने मोठा आरोप करून नवा वाद निर्माण केला आहे.
समिती सदस्य असतानाही झाले गैरवर्तन :पर्यवेक्षण समिती सदस्य बबिता फोगटने केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे. समिती सदस्य असतानाही माझ्याशी गैरवर्तन करण्यात आले. माझ्या हातून अहवालही हिसकावून घेण्यात आला. समिती सदस्य राधिका श्रीमानने आपल्याशी गैरवर्तन करत हातातून अहवाल हिसकावून घेतल्या आरोप बबिता फोगटने केला आहे. तू त्याच्या खेळाडूंच्या कुटुंबातील असल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आला. मी चौकशी समितीसमोर अनेक आक्षेप नोंदवले होते. पण माझ्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करण्यात आले, असेही बबिता फोगटने स्पष्ट केले. याला विरोध करत मी अहवालावर सही केल्याचेही तिने यावेळी सांगितले.
पुन्हा दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलन :भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. त्यामुळे कुस्तीपटू पुन्हा एकदा दिल्लीच्या जंतरमंतरवर धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी थेट ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेची मागणी कुस्तीपटू करत आहेत. जोपर्यंत त्यांच्या तक्रारीवर एफआयआर दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत ते आंदोलन मागे घेत नसल्याचे कुस्तीपटूंनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, बबिता फोगटच्या आरोपाने या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
संपूर्ण प्रकरणाची चौकशी :सरकारच्या चौकशी समितीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली आहे. त्याचा अहवाल गृह मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालयालाही सादर करण्यात आला आहे. या चौकशी समितीत बबिता फोगट यांचाही समावेश करण्यात आला आहे. बबिता फोगटने समितीच्या अन्य सदस्य राधिका श्रीमन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर क्रीडा मंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि देखरेख समिती स्थापन केली होती.
सरकारच्या समितीवरच खेळाडूंचा आक्षेप :सरकारने या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. यात खेलरत्न पुरस्कार विजेती एम सी मेरी कोम यांना चौकशी समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यांच्याशिवाय खेलरत्न पुरस्कार विजेते योगेश्वर दत्त, ध्यानचंद पुरस्कार प्राप्त तृप्ती मुरगुंडे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सदस्या राधिका श्रीमन आणि राजेश राजगोपालन यांचा या समितीत सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र, नंतर बजरंग पुनियासह सर्वच कुस्तीपटूंनी या समितीच्या स्थापनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. समिती स्थापन करताना खेळाडूंचा सल्ला घेतला नसल्याचा आरोप कुस्तीपटूंनी केला आहे.
सर्व पैलवान हे एक कुटुंबच आहे :ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोप करणारी कुस्तीपटू विनेश फोगट ही बबिता फोगटची चुलत बहीण आहे. त्याचवेळी या संपाचे नेतृत्व करणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया हा देखील बबिता फोगटचा नातेवाईक आहे. बबिता फोगटची बहीण संगीता फोगट ही बजरंग पुनियाची पत्नी आहे. कुटुंबाच्या प्रश्नावर बबिता म्हणाली की, माझ्यासाठी सर्व पैलवान हे एक कुटुंब आहे. कुस्तीपटूंना कोणी एकाच कुटुंबातील असल्याचे सांगत असेल तर ते चुकीचे नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा - Sachin Tendulkar 50 Not Out : मास्टर ब्लास्टरने वाढदिवसाची सुरुवात केली एका खास पद्धतीने, चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या