मुंबई - डॉ. भीमराव आंबेडकर यांचा प्रवास संघर्षाने भरलेला राहीला. परंतु, या पावलोपावली वाट्याला आलेल्या संघर्षावर मात करत शिक्षणाचे दार ठोठावत हा संघर्षाचा प्रवास महामानव होण्यात स्थिरावला. (Ambedkar Birt Anniversary Is Being Celebrated) भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये बाबासाहेबांचा मोलाचा वाटा आहे. बाबासाहेब जातिव्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारे एक समाजसुधारकही होते. आज गुरूवार (दि. 14 एप्रिल)रोजी त्यांची जयंती सर्वत्र आनंदाने साजरी होत आहे.
जयंतीचा इतिहास -14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते. तेव्हापासून दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात, 14 एप्रिल ही दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते.
जयंतीचे महत्त्व -डॉ. बाबासाहेब दलित समाजाच्या समान हक्कासाठी लढले. याशिवाय भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करून जात, धर्म, संस्कृती, पंथ इत्यादी बाजूला सारत सर्व नागरिकांना समान अधिकार दिले. आंबेडकर राज्यसभेतून दोनदा खासदार म्हणून निवडून आले. पुढे, डॉ. भीमराव आंबेडकर यांचे (6 डिसेंबर 1956)रोजी निधन झाले. (1990)मध्ये मरनोत्तर बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.