महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 11, 2021, 9:01 PM IST

Updated : Dec 11, 2021, 9:55 PM IST

ETV Bharat / bharat

CDS Bipin Rawat Death : बिपीन रावत यांच्या अपघातामागे षडयंत्र - योगगुरू बाबा रामदेव

सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या अपघातामागे काही काही षडयंत्र आहे, असे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे. ( Baba Ramdev On CDS Bipin Rawat Death ) त्याचवेळी त्यांनी सीडीएस बिपिन रावत यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. ( Baba Ramdev Demand To Give Bharatratna to CDS Bipin Rawat )

BABA RAMDEV
योगगुरू बाबा रामदेव

हरिद्वार - सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या अपघातामागे काही काही षडयंत्र आहे, असे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केले आहे. ( Baba Ramdev On CDS Bipin Rawat Death ) बाबा रामदेव यांनी आज पतंजली योगपीठात कन्या गुरुकुलमच्या भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

माध्यमांशी बोलताना बाबा रामदेव

भारताचे सर्वात पहिले सीडीएस, जनरल बिपीन रावत यांचे अपघाती निधन ( CDS General Bipin Rawat helicopter crash ) झाले. हवाई दलाच्या (Air Force) MI-17 V5 हेलिकॉप्टरमधून लष्कराच्या तळावर जात असताना निलगिरीच्या घनदाट जंगलात त्यांचा अपघात झाला. हेलिकॉप्टर लँड होण्यापूर्वी काही मिनिटे आधी हा अपघात झाला. यामध्ये जनरल रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर ११ अधिकारी अशा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला.

काय म्हणाले बाबा रामदेव?

या घटनेवर कोणताही देशवासीय विश्वास ठेवत नसल्याचे बाबा रामदेव म्हणाले. पंतप्रधान आणि राष्ट्रपती ज्या हेलिकॉप्टरमधून अशा प्रकारे प्रवास करतात, त्या हेलिकॉप्टरचा अपघात होण्यामागे अनेक प्रश्न, अनेक शंका आणि अनेक षडयंत्र असू शकतात. जे लवकरच उघड होईल. त्याचवेळी त्यांनी सीडीएस बिपिन रावत यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. ( Baba Ramdev Demand To Give Bharatratna to CDS Bipin Rawat )

  • कोण होते सीडीएस बिपिन रावत?

बिपिन रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ रोजी डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील एल. एस रावत देखील लष्करातच होते. लेफ्टनंट जनरल एल. एस. रावत म्हणून ते ओळखले जायचे. वडील लष्कारमध्ये असल्याने बिपिन रावत यांचं बालपण लष्करी शिस्तीमध्येच गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण शिमल्यामधील सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झाले. त्यानंतर बिपिन रावत यांनी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि ते पुन्हा डेहराडूनला आले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेण्याचे ठरवले आणि ते अमेरिकेला गेले, तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही केला.

  • भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ -

31 डिसेंबर 2019 रोजी भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून जनरल बिपिन रावत यांनी कार्यभार स्विकारला होता. यापूर्वी भारताचे 26 वे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झालेल्या रावत सप्टेंबर 2016 मध्ये जबाबदारी स्वीकारली होती. 2016 मध्ये लष्कराचे उपमुख्याधिकारी म्हणून तोपर्यंत ते कार्यभार पाहत होते. त्यापूर्वी ते पुण्यातील सदर्न कमांडचे GOC इन कमांड होते. राष्ट्रीय रायफल्स आणि काश्मीर खोऱ्यात लष्करी तुकडीचे नेतृत्व देखील रावत यांनी केले आहे. भारतीय लष्करात ब्रिगेडपदी असताना रावत यांनी काँगो येथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेच्या बहुराष्ट्रीय ब्रिगेडचे नेतृत्व केले आहे.

  • बिपिन रावत यांना मिळालेले सन्मान -

बिपिन रावत यांना सैन्यात अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लष्करात अनेक पदकं त्यांनी मिळवली आहेत. त्यांच्या सेवेत रावत यांना परम विशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक आणि सेना पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा - अपघात की घातपात? तपासातून धडा घेण्याची गरज

Last Updated : Dec 11, 2021, 9:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details