पाहा काय म्हणाले बाबा रामदेव हरिद्वार (उत्तराखंड) : अनेकदा वादग्रस्त विधाने करून सतत चर्चेत राहणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी हरिद्वारमध्ये त्यांनी अॅलोपॅथी औषधीबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.
'अॅलोपॅथीला जमिनीत गाडून टाकू' :बाबा रामदेव यांनी या आधी अनेकदा बहुराष्ट्रीय कंपन्यांवर टीका केली आहे. आताहरिद्वार येथील ऋषी कुल आयुर्वेद महाविद्यालयात सुरू असलेल्या आयुर्वेद चर्चासत्रात बोलताना स्वामी रामदेव म्हणाले की, ज्या प्रकारे आम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांना धोबीपछाड दिला आहे, त्याच पद्धतीने आम्ही अॅलोपॅथीलाही जमिनीत गाडून टाकू. आम्ही अॅलोपॅथीचा असे हाल करू की हे औषध पुन्हा कधी यातून उभे राहू शकणार नाही.
ऋषीकुल आयुर्वेदिक कॉलेजमध्ये सेमिनार सुरु : रविवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ऋषीकुल आयुर्वेदिक कॉलेजमध्ये सुरू असलेल्या आयुर्वेदिक पशुवैद्यकीय सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी हरिद्वारला पोहोचले. योगगुरू रामदेव बाबाही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यावेळी बाबा रामदेव यांनी अॅलोपॅथीबाबत हे विधान केले आहे. बाबा रामदेव यांनी सेमिनारमध्ये आलेल्या विद्यार्थी आणि तरुणांना त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले. ते म्हणाले की, याद्वारे यश नक्की मिळेल. सेमिनारमध्ये उपस्थित डॉक्टरांनी माझ्या विधानाचे वाईट वाटून घेऊ नये, असेही ते म्हणाले. आमचे म्हणणे समजून घेऊन तुम्हीही आमच्या बाजूने या, असे ते शेवटी म्हणाले.
'अॅलोपॅथीमुळे अनेकांची किडनी खराब' :स्वामी रामदेव यांनी आयुर्वेदच वर्तमान आणि भविष्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, अॅलोपॅथीमुळे लोकं अधिक आजारी पडत आहेत. आम्ही कोरोनाचे औषधही तयार केले होते. मात्र अॅलोपॅथिला अद्याप कोरोनाचे औषध सापडलेले नाही. जर जगात 25 टक्के लोकांच्या लिव्हरमध्ये त्रास असेल तर त्याचे कारण फक्त आणि फक्त अॅलोपॅथिक औषधे आहेत. खरे तर अॅलोपॅथीमुळे अनेकांची किडनी खराब झाली आहे'.
हे ही वाचा :Budget Session 2023 : संसदेत सत्ताधाऱ्यांसह काँग्रेसचा गोंधळ, दोन्ही सभागृहांचे कामकाज आज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब