उज्जैन -श्रावण महिना सुरू झाल्यामुळे अनेक शिवभक्त महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत आहेत. मंगळवारी देखील उज्जैनमध्ये बाबा महाकालेश्वर मंदिरात भस्म आरतीदरम्यान ( Bhasma Aarti In Mahakaleshwar temple ) पंचामृत अभिषेकासाठी भाविकांची गर्दी पहायला मिळाली. भगवान महाकाल यांनी सर्पदेवाचे रूप धारण केले ( Baba Mahakals Serpent Form ). बाबा महाकाल यांच्या मूर्तीला भांग, चंदन आणि अबीर गुलाल लावून त्यांना सजवण्यात आले ( idol Baba Mahakal decorated ). भगवान महाकाला यांना भस्म कलश अर्पण ( offering Bhasma Kalash to Mahakala ) करून आरती करण्यात आली आणि विविध प्रकारच्या मिठाईंचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.
पुजाऱ्यांकडून अप्रतिम श्रृंगार - उज्जैन. मंगळवारी महाकालेश्वर मंदिरात नांगपंचमीला पहाटे अडीच वाजता होणाऱ्या भस्म आरतीमध्ये सर्वप्रथम भगवान महाकालाला जल अर्पण करून स्नान करण्यात आले. यानंतर पुजाऱ्यांच्या हस्ते भगवानांना दूध, दही, तूप, मध, पंचामृताचा अभिषेक करण्यात आला. यानंतर भगवान महाकाल यांच्या मूर्तीचा पुजाऱ्यांकडून अप्रतिम श्रृंगार करण्यात आला. भगवान महाकालाला भस्म अर्पण करून आरती करण्यात आली. ज्यामध्ये बाबा महाकाल यांना फळे आणि विविध प्रकारची मिठाई अर्पण करण्यात आली.