इंदूर -महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मशिंदीवरील अजान आणि हनुमान चालीसा पठण यावरुन वाद सुरु आहे. त्यातच आता मध्यप्रदेशमध्ये मशिंदीवरील अजान दिले जाईल त्यावेळेस हनुमान चालीसाचे पठण होणार आहे. तसेच, अन्य मंदिरांमध्येही हनुमान चालीसा पठणासाठी लाऊडस्पीकर लावण्यात येणार ( Indore Hanuman Chalisa Row ) आहे.
मशिदींवर लाऊडस्पीकविरोधात नागरिकांनी उठवला आवाज - इंदूरमधील विविध पोलीस स्थानकात संघटनांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मशिदींवर लाऊडस्पीकर काढून टाकण्यासाठी अर्ज केला होता. परवानगीशिवाय बेकायेदेशीरपणे हे लाऊडस्पीकर सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, तक्रार करुनही लाऊडस्पीकर हटवण्यात आले नाही. त्यामुळे चंद्रभागा प्राचीन खेडापती हनुमान मंदिर हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली. यापुढे आता मशिदींवरील लाऊडस्पीकर सुरु होतील, तेव्हा हनुमान चालीसाचे पठण करण्यात येणार आहे.