महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ayushman Card Yojana : आयुष्मान योजना काय आहे आणि कोणाला मिळतो त्याचा लाभ, जाणुन घेऊया - Who Is Eligible For Ayushman Card Yojana

लोकांना मोफत आरोग्य सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान कार्ड योजना (Ayushman Card Yojana) सुरू केली. या योजनेचा लाभही मोठ्या प्रमाणात लोक घेत आहेत यात शंका नाही. अशा परिस्थितीत आयुष्मान योजनेबद्दल (Ayushman Card Benefits) जाणून घेऊया आणि त्याचा लाभ कोणाला (Eligible For Ayushman Card Yojana) मिळतो.

Ayushman Card Yojana
आयुष्मान योजना कार्ड

By

Published : Dec 8, 2022, 11:23 AM IST

देशात अशा अनेक योजना सुरू आहेत, ज्यासाठी लोकांच्या थेट लाभासाठी त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत पाठवली जाते. तर अनेक गोष्टी गरजू आणि गरीब वर्गातील लोकांना थेट दिल्या जातात. मोफत रेशन, शिक्षण, बेरोजगारी भत्ता, घरे, रोजगार योजनांसह आर्थिक मदत अशा अनेक योजनांचा समावेश आहे. तसेच लोकांना मोफत आरोग्य सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान कार्ड योजना (Ayushman Card Yojana) सुरू केली. या योजनेचा लाभही मोठ्या प्रमाणात लोक घेत आहेत यात शंका नाही. अशा परिस्थितीत आयुष्मान योजनेबद्दल (Ayushman Card Benefits) आणि त्याचा लाभ कोणाला मिळतो (Eligible For Ayushman Card Yojana), जाणून घेऊया.

काय आहे योजना :या योजनेचे नाव आयुष्मान भारत योजना असे होते. मात्र, आता या योजनेचे नाव बदलून 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री योजना' असे करण्यात आले आहे. योजनेंतर्गत, पात्र लोकांसाठी आयुष्मान कार्ड बनवले जातात, ज्यानंतर कार्डधारक त्यांचे 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार पॅनेलमधील हॉस्पिटलमध्ये घेऊ शकतात.

तुमचे आयुष्मान कार्ड बनवता येते की नाही हे तुम्हालाही जाणून घ्यायचे असेल, तर यासाठी तुम्हाला तुमची पात्रता तपासण्यासाठी योजनेच्या अधिकृत पोर्टल https://pmjay.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला 'Am I Eligible' या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड म्हणजेच OTP येईल, तो येथे टाका. आता तुमच्यासमोर दोन पर्याय दिसतील, ज्यामध्ये तुम्हाला पहिले राज्य निवडायचे आहे.

त्यानंतर दुसऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि रेशनकार्ड क्रमांक टाकावा लागेल. हे केल्यावर तुमची पात्रता तुमच्या समोर येईल आणि तुम्हाला कळेल की तुमचे आयुष्मान कार्ड बनवता येते की नाही. आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची एक आरोग्य योजना आहे, जी 23 सप्टेंबर 2018 रोजी संपूर्ण भारतात लागू करण्यात आली होती. या योजनेची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी 2018 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती.

या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना (बीपीएल धारक) आरोग्य विमा प्रदान करणे आहे. या अंतर्गत समाविष्ट असलेल्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांपर्यंतचा कॅशलेस आरोग्य विमा प्रदान केला जाईल. 10 कोटी बीपीएल धारक कुटुंबे (सुमारे 50 कोटी लोक) या योजनेचा थेट लाभ घेऊ शकतील. याशिवाय, उर्वरित लोकसंख्येला या योजनेत आणण्याची योजना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details