लखनऊ ( उत्तरप्रदेश ) - प्रभू राम हे आस्थेचा विषय आहे, त्यामुळे रामदर्शनावरुन राजकारण नको असे मत शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त ( Aaditya Thackeray Ayodhya Tour ) केले. लखनऊ विमानतळावर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.
अयोध्येकडे रवाना :मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्येत पोहोचणार ( Aditya Thackeray Ayodhya Tour ) आहेत. ते सुमारे 6 तास अयोध्येत राहणार आहेत. आदित्य ठाकरे श्री राम लल्लाच्या दर्शन आणि धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे ते नातू आहेत. त्यांचे वडील उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. दरम्यान, मुंबईहून सकाळीच विमानाने आदित्य ठाकरे हे उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमध्ये दाखल झाले. यावेळी विमानतळावर आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आता ते अयोध्येकडे रवाना झाले आहेत.