महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राम मंदिर, योगी आदित्यनाथ यांना बॉम्बनं उडवण्याच्या धमकी प्रकरणात दोघांना अटक, कशामुळे रचला होता कट? - राम मंदिर

Ram temple CM Threat Case : राम मंदिर, उत्तर प्रदेशचे मुख्यंत्री योगी आदित्यनाथ आणि एसटीएफचे एडीजी अमिताभ यश यांना बॉम्बने उडवू देण्याची धमकी आली होती. त्या प्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊ.

Ram temple CM Threat Case
राम मंदिर धमकी प्रकरण

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 4, 2024, 10:16 AM IST

लखनौ : Ram temple CM Threat Case : श्रीराम मंदिर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एसटीएफचे एडीजी अमिताभ यश यांना बॉम्बने उडवू असा एक ईमेल आला होता. त्या प्रकरणात आता मोठा खुलासा समोर आलाय. स्वत:ला गोसेवक आणि शेतकरी नेता म्हणवून घेणाऱ्या एका कॉलेजच्या संचालकानं संपूर्ण कट रचला असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. तहर सिंग आणि ओमप्रकाश मिश्रा अशी आरोपींची नावं आहेत.

या ई-मेलचा केला वापर : दोघेही आरोपी गोंडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींनी चौकशीत सांगितले की ते एका पॅरामेडिकल संस्थेत काम करतात. सध्या त्यांची कसून चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलय. यूपी एसटीएफनं नोव्हेंबरमध्ये सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, धमक्या देण्यासाठी alamansarikhan६०८@gmail.com आणि zubairkhanisi१९९@gmail.com या मेल आयडीचा वापर करण्यात आलाय. तांत्रिक विश्लेषणानंतर तहर सिंगने हे ईमेल आयडी तयार केले. ओमप्रकाशने धमकीचे संदेश पाठवला. तसेच, ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव जुबैर हुसेन सांगण्यात येतय. त्याने तो आयएसआय या दहशवादी संघटनेशी संबंधित असल्याचा उल्लेख ईमेलमध्ये केलाय. या प्रकरणी लखनौ पोलिसांत एफआयआर नोंद करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा एसटीएफ तपास करत आहे. एसएसपीच्या म्हणण्यानुसार, देवेंद्र हे सर्व चर्चेत राहण्यासाठी, सुरक्षा मिळवण्यासाठी आणि राजकीय फायदा मिळवण्यासाठी करत होता. सध्या तरी देवेंद्र तिवारीला अटक झालेली नाही.

असा झाला प्लॅन :शेतकरी नेते देवेंद्र तिवारी यांच्या माहितीवरून, यूपी ११२ मध्ये तैनात इन्स्पेक्टर सहेंद्र कुमार यांनी (२८ डिसेंबर)रोजी सुशांत गोल्फ सिटी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. यामध्ये देवेंद्रला झुबेर खान नावाचा ई-मेल आल्याचं सांगण्यात आलं होतं. यामध्ये श्री राम मंदिर, मुख्यमंत्री योगी आणि एसटीएफ प्रमुख अमिताभ यशला बॉम्बने उडवून देतील अशी धमकी देण्यात आली होती. पोलिसांसोबतच इतर अनेक तपास यंत्रणाही या प्रकरणाच्या तपासात गुंतल्या आहेत. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, ई-मेल जिथून पाठवला होता, तो आयपी पत्ताही माहीत झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details