नवी दिल्लीAyodhya Airport Rename:अयोध्येतील नवीन विमानतळाचे नाव महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असेल, असं पंतप्रधान कार्यलयानं प्रेसनोटमध्ये म्हटलंय. तसंच (२७ डिसेंबर) रोजी अयोध्या रेल्वे स्थानकाचं नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन करण्यात आलं होतं.
मोदींच्या हस्ते उद्घाटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (30 डिसेंबर) रोजी अयोध्येला भेट देणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदी विमानतळ तसंच रेल्वे स्टेशनचं उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान कार्यालय (PMO) दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येच्या अत्याधुनिक विमानतळाचा पहिला टप्पा 1 हजार 450 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. विमानतळ टर्मिनल इमारतीचं क्षेत्रफळ 6 हजार 500 चौरस मीटर असणार आहे. यामुळं दरवर्षी 10 लाख प्रवाशांना सेवा प्रदान करण्यात येणार आहे.
विमानतळ सुविधांनी सुसज्ज :अयोध्या विमानतळाची टर्मिनल इमारत विविध सुविधांनी सुसज्ज आहे. ज्यात इन्सुलेटेड रूफिंग सिस्टीम, एलईडी लाइटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कारंज्यांसह लँडस्केपिंग, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, सीवेज ट्रीटमेंट प्लांट, सोलर पॉवर प्लांट यांचा समावेश आहे.
अयोध्या धाम जंक्शनची वैशिष्ट्ये : पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्टेशनचा पहिला टप्पा 240 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून ओळखलं जाणारे तीन मजली आधुनिक रेल्वे स्थानक आहे. यात लिफ्ट, एस्केलेटर, फूड प्लाझा, पूजा गरजांसाठी लागणारी दुकानं, क्लोक रूम, चाइल्ड केअर रूम, वेटिंग हॉल यासारख्या सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.