मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्या हस्ते प्रसिद्ध क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर ( Cricketer Dilip Vengsarkar ) यांना क्रिकेटमधील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सीएसआर जर्नल या डिजिटल व प्रिंट प्रकाशनातर्फे हा पुरस्कार देण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे राज्यपालांच्या व केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Minister Nitin Gadkari ) यांच्या हस्ते, सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध कॉर्पोरेट्स व संस्थांना चौथे सीएसआर जर्नल एक्सलन्स पुरस्कार 2021 ( CSR Journal Excellence Award 2021 ) प्रदान करण्यात आले. त्यावेळी वेंगसरकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मी स्वतःच्या पैशाने कधीच पब्लिसिटी केली नाही - गडकरी
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, मी मागील 15 ते 20 वर्षापासून अशाच कार्यक्रमात एनर्जी खर्च करतो. या पैशातून समाजातील शोषित पीडित लोकांना मदत होते. मी हे मानतो जी मदत भेटते ती एकदा घ्यावी परत नाही. हे कठीण आहे पण असंभव नाही आहे. मी भाजप अध्यक्ष होतो, तेव्हा सर्वांना सांगितले काही सोशल वर्क करावे लागेल. जॉर्ज फर्नांडिस माझे आयकॉन. मला कोणी एअरपोर्टवर घेण्यासाठी आलेले चालत नाही. सत्कार समारंभ मला चालत नाहीत. मी आयुष्यात कधीच स्वतःच्या पैशाने कट आऊट लावले नाहीत, माझी पब्लिसिटी केली नाही. नागपुरात टॉयलेटच पाणी शुद्ध करून विकले जाते, ज्याचे आम्हाला 325 करोड भेटतात. आयुष्यात फक्त दोनदाच हार विकत घेतले. एकदा लता मंगेशकर व एकदा अटल बिहारी वाजपेयी यांच्यासाठी, असे सांगत जनतेसाठी काम करा जनता तुमच्यासाठी उभी राहील. असा सल्लाही त्यांनी या प्रसंगी दिला. तसेच एखादे काम करताना सरकारी अधिकाऱ्याकडे जाऊ नका .नाहीतर चालणारी योजना बंद होईल, असे सांगत आत्मनिर्भर बनण्याचा सल्ला त्यांनी या प्रसंगी दिला.
गडकरी चालते-बोलते विद्यापीठ- मुनगंटीवार
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की माझे मार्गदर्शक, नेता, भारत विकास पुरुष नितीन गडकरी यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद झाला आहे. मी सीएसआर जर्नलचे आभार मानतो. 1989 साली लूना मोपेटवर नितीनजी सोबत फिरून, मी माझं राजकीय जीवन सुरू केलं. मी माझ्या जिल्ह्यात सीएसआरच्या माध्यमातून काम केलं. 'गरीबो की सूनो, वह तुम्हारी सूनेगा', असे सांगत आज पुरस्कार घेताना ऊर्जा तर भेटली आहे. गडकरी हे चालते-फिरते विद्यापीठ आहेत. आयटीसी बरोबर 1200टन अगरबती निर्माण करण्याचं काम आम्ही केले. आत्मनिर्भर भारतची सुरुवात आम्ही टूथ पेस्टने केली. रतन टाटा यांना पत्र लिहून एक कॅन्सर हॉस्पिटल चंद्रपूर व एक वाराणसी येथे उघडले गेले, असेही ते म्हणाले. सेंट्रल विस्टाला चंद्रपूरच कार्पेट वापरले जावे, अशी इच्छा त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.