महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

JK Avalanche warning : जम्मू - काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशारा - जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलन

येत्या काही दिवसांत जम्मू - काश्मीरमधील काही जिल्ह्यांमध्ये लोकांना हिमस्खलनाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून या संदर्भात इशारा देण्यात आला आहे.

JK Avalanche
जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलन

By

Published : Mar 25, 2023, 9:49 AM IST

श्रीनगर (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू - काश्मीरमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या दृष्टीने आता प्रशासन तयारीला लागले आहे. या संदर्भात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने इशारा दिला आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हिमस्खलनामुळे जास्त नुकसान होण्याची शक्यता नाही. अधिकाऱ्यांनी समुद्रसपाटीपासून 2,800 ते 3,000 मीटर उंचीवर हिमस्खलन होण्याची शक्यता वर्तविली आहे.

धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मते, काश्मीरच्या बारामुल्ला, डोडा, गंदरबल, किश्तवाड, कुपवाडा, कुपवाडा, पूंछ, रामबन, रियासी, अनंतनाग आणि कुलगाममध्ये समुद्रसपाटीपासून उंचीवर हिमस्खलन होण्याची शक्यता आहे. हिमस्खलनाचा धोका असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी आपत्ती प्राधिकरणाने एक सूचना जारी केली आहे. त्यांना बाधित भागात जाणे टाळण्यास सांगितले गेले आहे.

जम्मू - काश्मीरमध्ये हिमस्खलनाच्या घटना वाढल्या : गेल्या काही वर्षांपासून जम्मू - काश्मीरमध्ये हिमस्खलनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या आपत्तींमध्ये अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहे. मात्र, खबरदारी घेतल्यास त्यापासून होणारा धोका कमी होऊ शकतो. त्यासाठी सरकारने दिलेल्या सूचनांकडे लोकांनी लक्ष द्यावे. नुकतीच फेब्रुवारी महिन्यात हिमस्खलनाची मोठी घटना घडली होती. या अपघातात दोन परदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

हिमस्खलनात विदेशी पर्यटक अडकले होते : मिळालेल्या माहितीनुसार, या हिमस्खलनात 19 विदेशी पर्यटक अडकले होते त्यात दोन गाईडचाही समावेश आहे. मात्र सतर्क प्रशासनाने त्यांना वेळीच सुखरूप वाचवले. पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, 21 परदेशी आणि दोन स्थानिक मार्गदर्शकांचा समावेश असलेली तीन टीम स्कीइंगसाठी गुलमर्ग येथे गेली होती. हिमस्खलनाची समस्या विशेषतः पावसाळ्यात दिसून येते. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या शोषणामुळे असे घडत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लोक निसर्गाशी छेडछाड करतात, त्यामुळे त्याचे धोकेही वाढतात.

हे ही वाचा :Aishwarya Rajini Theft : रजनीकांतच्या मुलीच्या घरी चोरी, प्रकरणात ट्विस्ट, जिच्या घरी चोरी तिचीच होणार आता चौकशी

ABOUT THE AUTHOR

...view details