बंगळुरु (कर्नाटक) : देशभरात वारंवार पाहायला मिळते कुणी व्यक्ती काहीतरी व्यक्तव्य करतात आणि देशभर वातावरण चिघळलेले असते. यामध्ये कपड्यांपासून ते रंगापर्यंत हा वाद कायम सुरू असतो. असाच प्रकार आता समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही वरीष्ठ पदावर बसलेल्या नेतेमंडळींकडून इतिहासातील महान व्यक्तिमत्वांविषयी आक्षेपार्ह विधाने करण्यात आल्याचे आपण पाहिले आहेच. या विधानांवरून मोठा वादही निर्माण झाल्याचं दिसून आले आले. त्यानंतर आता कर्नाटकमध्ये निवृत्त प्राध्यापक के. एस. भगवान यांनी भगवान श्रीराम यांच्याविषयी केलेलं विधानाची जोरदार चर्चा आहे. भगवान यांनी आपल्या विधानाला वाल्मिकी रामायणातला संदर्भ दिल्यामुळे त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वक्तव्याने सर्वत्र चर्चा : भगवान राम दुपारच्या वेळी सीतेसमवेत बसायचे आणि उरलेला पूर्ण दिवस मद्य पिण्यात घालवायचे. त्यांनी त्यांची पत्नी सीतेला अरण्यात पाठवले. तिच्याबद्दल कोणताही विचार त्यांनी केला नाही. त्यांनी एका झाडाखाली तपश्चर्या करत बसलेल्या शंबूक या सूद्र व्यक्तीचे मुंडके धडावेगळे केले होते. त्यामुळे ते आदर्श कसे असू शकतील? असा सवालही भगवान यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. काही ठिकाणी यावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.