बर्मिंगहॅम: इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटला धमाकेदार ( AusW vs IndW ) सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतीय महिला संघात झालेल्या सामन्यात भारताचा पराभव ( Australia women won by3 wickets ) झाला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने तीन विकेट्स जिंकला. प्रथम फलंदाजी करता भारतीय संघाने 8 बाद 154 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19 षटकांत 7 गडी गमावून 157 धावा केल्या.
या टी-20 सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजीचा शानदार नजारा सादर केला, त्यानंतर भारताच्या रेणुका सिंगने ( Indian bowler Renuka Singh ) अप्रतिम गोलंदाजी करत कांगारू संघाला गुडघ्यापर्यंत आणले. मात्र, रेणुका सिंगचा हा शानदार स्पेलही टीम इंडियाला विजय मिळवून देऊ शकला नाही. अखेरीस भारताने हा सामना 3 विकेटने गमावला.
या सामन्यात 26 वर्षीय रेणुका सिंगने भारतीय संघाकडून गोलंदाजीची सुरुवात केली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 155 धावांचे लक्ष्य दिले होते, अशा परिस्थितीत कांगारू संघाला कसे रोखायचे हे भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान होते. येथे रेणुका सिंगने आघाडी घेतली, जिने डावाच्या दुसऱ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीला पायचीत केले. आपल्या पहिल्या तीन षटकांमध्ये रेणुका सिंगने ऑस्ट्रेलियन संघाच्या टॉप ऑर्डरचे कंबरडे मोडले. तिने पहिल्या पाच षटकांतच ऑस्ट्रेलियाचे आघाडीचे 4 फलंदाज बाद केले.