महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काकीसोबत पुतण्या करत होता 'रोमान्स'.. काकाने पकडलं अन् झालं 'असं' काही

बिहारच्या पूर्णियामध्ये, लोकांनी एका अल्पवयीन पुतण्याचे लग्न काकींसोबत लावून दिले (Aunt And Nephew Got Married In Purnea). बनमंखी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अजब प्रकार समोर आला आहे. काकूचे पुतण्यासोबत प्रेमसंबंध सुरू होते आणि काकांनी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पकडले आणि नंतर गावकऱ्यांना माहिती देऊन दोघांचे लग्न लावून दिले. वाचा संपूर्ण बातमी..

By

Published : Sep 20, 2022, 7:58 AM IST

AUNT AND NEPHEW GOT MARRIED IN PURNEA AFTER FOUND IN SUSPICIOUS CONDITION
काकीसोबत पुतण्या करत होता 'रोमान्स'.. काकाने पकडलं अन् झालं 'असं' काही

पूर्णिया: बिहारच्या पूर्णियामध्ये पुतण्या आणि काकी (Aunt And Nephew Love Story In Purnea) यांच्यातील अवैध संबंध होते. महिलेच्या पतीने आणि गावकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर पुतण्या आणि काकीचा जबरदस्तीने विवाह करण्यात आला. हे प्रकरण पूर्णिया जिल्ह्यातील बनमंखी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिप्रा गावातील प्रभाग 10 मधील आहे. कोणीतरी जबरदस्तीने लग्न करण्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना 12 सप्टेंबरची आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

महिलेच्या पतीने स्वतःहून लावले लग्न : पिपरा गावात राहणाऱ्या एका महिलेचे (वय ४४ वर्षे) तिच्याच पुतण्यावर (वय १४ वर्षे) प्रेम होते, असे सांगितले जात आहे. दोघांची गुप्त भेट होऊ लागली. प्रेम इतकं वाढलं की दोघेही मोकळेपणाने भेटू लागले. ही बाब महिलेच्या पतीला कळताच दोघांनाही घरी नको त्या अवस्थेत रंगेहात पकडले. मग काय, घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी जमली. महिलेचा पती आणि गावकऱ्यांनी जबरदस्तीने दोघांचे लग्न लावून दिले. गावकऱ्यांच्या भीतीने अल्पवयीन मुलाने स्वतःच्या काकींसोबत लग्न केले.

काकीआणि पुतण्याचं लग्न : गावातल्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर चांगलीच चर्चा सुरु आहे. महिलेचे वय सुमारे 44 वर्षे असून मुलाचे वय अवघे 14 वर्षे आहे. दोघांच्या वयात 30 वर्षांचा फरक आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे अल्पवयीन मुलगा महिलेच्या पतीच्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. दोघांमध्ये काकू-पुतण्याचं नातं आहे.

'महिलेला 3 मुलेही आहेत. पती पंजाबमध्ये काम करतो. दोघांमधील प्रेमसंबंध घरच्यांना समजल्यानंतर महिलेच्या पतीला फोनवरून माहिती देण्यात आली. पतीने कोणालाही न सांगता गुपचूप घरी पोहोचून दोघांना रंगेहाथ पकडल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

व्हायरल व्हिडिओची पुष्टी झाली आहे. अल्पवयीन मुलाशी लग्न करणाऱ्या महिलेच्या पतीसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करण्यात येत आहे. - दया शंकर, एसपी

ABOUT THE AUTHOR

...view details