महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न; मेहबुबा मुफ्ती यांचा आरोप - Jammu and Kashmir

पीडीपीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरची ओळख नष्ट केली जात आहे. पीडीपीचे ध्येय निवडणूक जिंकणे नाही, तर येथील जनतेचे संरक्षण करणे हे लक्ष आहे असही त्या म्हणाल्या आहेत.

पीडीपीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती
पीडीपीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती

By

Published : Nov 6, 2022, 9:28 PM IST

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या अस्मितेचे रक्षण करणे आणि सध्याच्या परिस्थितीशी लढणे ही निवडणुकीतील सर्वात मोठी कसोटी असल्याचे पीडीपीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. मेहबुबा म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थितीत पीडीपीमध्ये सामील होणे हे आगीशी खेळण्यासारखे आहे. मेहबूबा मुफ्ती यांनी गुपकर येथील शासकीय निवासस्थानी एका कार्यक्रमादरम्यान त्या बोलत होत्या. पीडीपीचे उद्दिष्ट निवडणुका जिंकणे नाही. परंतु, निवडणुकीची सर्वात मोठी परीक्षा म्हणजे सध्याची परिस्थिती आहे असही त्या म्हणाल्या आहेत. जम्मू-काश्मीरची केवळ ओळखच नष्ट केली जात नाही, तर तिचे अस्तित्व पुसून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, जम्मू-काश्मीरची ओळख आणि तेथील लोकांची ओळख अबाधित राहण्यासाठी अशा परिस्थितींना तोंड देण्याची गरज आहे.

'काश्मिरींच्या जीवनाला महत्त्व आहे का ? -पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) ने रविवारी आरोप केला की कलम 370 रद्द केल्यापासून काश्मिरी मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराच्या घटना घडत आहेत ज्या चिंताजनक आहेत. 'स्पीक-अप' या त्यांच्या मासिक वृत्तपत्रात, पक्षाने म्हटले आहे की, "काही आठवड्यांपूर्वी, अखनूर येथील एका महाविद्यालयावर बजरंग दलाच्या 'गुंडांनी' छापा टाकला होता. जेव्हा त्यांना मुस्लिम विद्यार्थी कॅम्पसमध्ये नमाज अदा करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकला. त्याने विद्यार्थ्यांना धमकावले असही त्या म्हणाल्या आहेत.

हत्यांच्या वाढीमुळे हे झाले - मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने म्हटले आहे की, उर्वरित देशात जे घडत आहे तेच शेवटी काश्मीरमध्ये घडत आहे आणि मुस्लिमांना भारतातील इतर ठिकाणी जशी वागणूक दिली जात आहे तशीच येथेही मिळत आहे. पीडीपीने सांगितले की, लक्ष्यित हत्यांच्या वाढीमुळे शोपियान आणि खोऱ्यातील इतर भागांमधील काश्मिरी पंडित कुटुंबांना जम्मूमध्ये जाण्यास भाग पाडले आहे असही त्या म्हणाल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details