नवी दिल्ली/गाझियाबाद :ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका मुलावर गाझियाबादमध्ये बलात्काराचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Rape attempt with foreign child in Ghaziabad). पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो मेरठचा रहिवासी आहे. गाझियाबादमध्ये एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी हा मुलगा आपल्या कुटुंबासह आला होता. मात्र, जेव्हा मुलाचे कुटुंब ऑस्ट्रेलियातून भारतात आले तेव्हा ते दिल्लीतील छतरपूर भागात राहिले. ही घटना गुरुवारी सायंकाळची आहे. (misbehave with 9 year old australian child).
Misbehave With Australian Child : हॉटेलमध्ये ऑस्ट्रेलियन मुलासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न - हॉटेलमध्ये ऑस्ट्रेलियन मुलासोबत गैरवर्तन
गाझियाबादमध्ये 9 वर्षीय ऑस्ट्रेलियन चिमुरड्यासोबत दुष्कर्माचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. (misbehave with 9 year old australian child). लग्न समारंभात हॉटेलच्या बाथरूममध्ये ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी नितेश नावाच्या आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. (Rape attempt with foreign child in Ghaziabad).

वॉशरूममध्ये गैरवर्तन : हे प्रकरण गाझियाबादच्या मसुरी पोलीस स्टेशन परिसरातील एका हॉटेलशी संबंधित आहे. इथे मुलगा आपल्या कुटुंबासह लग्न समारंभासाठी आला होता. जेव्हा मुलगा वॉशरूममध्ये गेला तेव्हा नितेश नावाच्या व्यक्तीने त्याला पकडले आणि त्याच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. आवाज ऐकून मुलाचे वडील वॉशरूममध्ये पोहोचले आणि आरोपीला जागीच पकडले. त्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी आरोपीची अटक केली आहे. मसुरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
तपास सुरु : मसुरी पोलिस स्टेशनचे प्रभारी रवींद्र चंद्र पंत यांनी सांगितले की, मुलाचे कुटुंबीय खूपच घाबरले आहे. हे कुटुंब ऑस्ट्रेलियाहून भारतात काही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले होते. त्यांचा गाझियाबादमध्ये एक कार्यक्रम होता. आरोपीचे नाव नितेश असून तो मेरठच्या गंगानगर भागातील रहिवासी आहे. आरोपी एका खासगी कंपनीत काम करतो. त्याच्याविषयी अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. काही सीसीटीव्हीही पोलिसांच्या हाती लागले असून, त्यामुळे पोलिसांकडे आरोपींबाबत पूर्ण पुरावे आहेत. मुलाचे मेडिकलही व्हावे, यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. मुलाचे कुटुंबीय मुलासह दिल्लीला परतले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे.