चंदीगड (पंजाब) - पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी भारतीय जनता पक्षावर मोठे आरोप केले आहेत. ते चंदीगडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (Attempt to break AAP MLA by giving money from BJP) चीमा म्हणाले की, भाजप पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, प्रत्येक आमदाराला २५ कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे.
Harpal Singh Cheema: भाजपकडून पैसे देऊन आप'चे आमदार फोडण्याचा प्रयत्न; हरपाल सिंग चीमा यांचा खुलासा - पंजाबध्ये आपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न
पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा यांनी भारतीय जनता पक्षावर मोठे आरोप केले आहेत. ते चंदीगडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ( Harpal Singh Cheema) चीमा म्हणाले की, भाजप पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, प्रत्येक आमदाराला २५ कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे.
यापूर्वी भाजपने गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेशात असेच केले आहे. आता पंजाबमध्येही आपच्या आमदारांना लक्ष्य केले जात आहे असही ते म्हणले आहेत. केंद्रीय एजन्सी सीबीआय आणि ईडी देखील आमदारांना त्यांच्या पक्षात आणण्यासाठी वापरल्या जात आहेत. चीमा म्हणाले की, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला फोडण्यासाठी भाजपने 1375 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प ठेवला आहे, जो काळ्या पैशातून गोळा करण्यात आला आहे. चीमा यांनी आरोप केला आहे की, गेल्या एका आठवड्यात आम आदमी पार्टीच्या ७ ते १० आमदारांना भाजपकडून संपर्क साधला जात आहे. तसेच, त्यांना थेट किंवा कोणत्याही माध्यमातून भाजपमध्ये सामील होण्यासाठी आमिष दाखवले जात आहे असही ते म्हणाले आहेत.