बर्नाळा बर्नाळा येथे लहान मुलांनी भरलेल्या स्कूल बसवर मोटारसायकल स्वारांनी धारदार शस्त्रांनी हल्ला Attack On School Bus केला. हल्लेखोरांनी बसच्या चालकावर हल्ला केला, मात्र चालकाने धाडस आणि हुशारी दाखवत घटनास्थळावरून वेगाने बस जवळच्या डीएसपी कार्यालयात नेली. त्यामुळे मोठी घटना टळली. या घटनेत शाळकरी मुले सुखरूप असून चालक जखमी Driver Injured Children Safe झाला आहे. बर्नाळा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बसच्या चालकाने हल्ल्याची माहिती देतानासांगितले की, बसमध्ये 35 मुले होती आणि तो या मुलांना शाळेतून घेऊन येत होता. दरम्यान, त्याला काही हल्लेखोरांनी त्यांची बस अडविली. त्यांनी बस थांबवून मला खाली उतरण्यास सांगितले आणि मारहाण केली. त्यात मी जखमी झालो आहे. त्यानंतर मी बस सुरक्षित स्थळी नेली. गेल्या काही दिवसांपासून त्याचा काही लोकांशी वाद सुरू असल्याचे समजते. यावरून त्यांनी त्याच्यावर हल्ला केला.