महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अटकेकरिता गेलेल्या महाराष्ट्रातील पोलिसांवर गाझियाबादमध्ये आरोपींसह कुटुंबियांचा जीवघेणा हल्ला - accused attack on Maharashtra Police team

ज्या आरोपीची महाराष्ट्रातील पोलीस चौकशी करणार होते, त्यांचीही स्थानिक पोलिसांनी चौकशी केली आहे. प्राथमिक उपचार झाल्यानंतर महाराष्ट्राचे पोलीस रवाना झाले आहेत.

आरोपींचा पोलिसांच्या वाहनावर हल्ला
आरोपींचा पोलिसांच्या वाहनावर हल्ला

By

Published : May 11, 2021, 6:47 PM IST

Updated : May 11, 2021, 7:01 PM IST

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये आरोपीला अटकेसाठी महाराष्ट्रातून गेलेल्या पोलिसांवर आरोपींसह त्याच्या कुटुंबियांनी हल्ला केला. यावेळी आरोपींसह त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. तसेच पोलिसांना मारहाणही केली. या घटनेत काही पोलीस जखमी झाले आहेत.


आरोपीसह त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांवर हल्ला केलेली घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आरोपींनी पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान केले आहे. जखमी झालेल्या पोलिसांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सहा आरोपींना अटक करण्यात आल्याचे गाझियाबादचे पोलीस अधीक्षक निपुण अग्रवाल यांनी सांगितले.

पोलिसांवर गाझियाबादमध्ये आरोपींसह कुटुंबियांचा जीवघेणा हल्ला

हेही वाचा-पोलिसांची 'हार्ट पेशंटला' अमानुष मारहाण; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..

आरोपींचा पोलिसांच्या वाहनावर हल्ला

संवदेनशील परिसर असल्याने पोलीस बंदोबस्त

कोरोनाच्या संसर्गात गर्दीला नियंत्रणात आणण्याचे काम पोलिसांना करावे लागले आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आरोपींवर आपत्कालीन कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात येत आहे. ज्या आरोपीची महाराष्ट्रातील पोलीस चौकशी करणार होते, त्यांचीही स्थानिक पोलिसांनी चौकशी केली आहे. प्राथमिक उपचार झाल्यानंतर महाराष्ट्राचे पोलीस रवाना झाले आहेत.
हेही वाचा-तेलंगाणामध्ये १२ मेपासून १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

गोपनीय ऑपरेशन अंतर्गत महाराष्ट्राचे पोलीस झाले होते दाखल-
मुंबई पोलीस गोपनीय ऑपरेशन अंतर्गत आरोपीच्या अटकेसाठी आली होती. त्यामुळे स्थानिक पोलिसांना कोणताही माहिती नव्हती. गर्दी पाहून स्थानिकांनी हल्ला केला असावा, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. या घटनेत कोणताही पोलीस गंभीर जखमी झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Last Updated : May 11, 2021, 7:01 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details