महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

PFI anty india पीएफआयचे देशाविरोधात भयंकर कारनामे, मिशन गझवा हिंद 2047 कटात सहभाग, अटक केलेल्या कार्यकर्त्यांची कबुली

यूपीमध्ये रचल्या जाणार्‍या एका भयंकर कटाचा पर्दाफाश एनआयएने ( National Investigation Agency ) पीएफआयच्या ( Popular Front of India PFI ) विविध ठिकाणांवर ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये आणि यूपी एटीएसच्या कारवाईत झाला आहे. जाणून घेऊया पीएफआयच्या या कटाबद्दल...

ats-is-questioning
ats-is-questioning

By

Published : Sep 24, 2022, 1:47 PM IST

लखनऊ : उत्तरप्रदेशात योगी सरकार आल्यापासून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया कडून ( Popular Front of India PFI ) राज्यातील मुस्लिमांच्या मनात विष कालवून आणि कट्टरता निर्माण करीत बंड करण्याचे मोठे षडयंत्र रचले जात होते. राष्ट्रीय तपास संस्थेचे ( National Investigation Agency ) छापे आणि पीएफआयच्या ( Popular Front of India PFI ) विविध ठिकाणांवर उत्तर प्रदेश एटीएसने ( ATS ) केलेल्या कारवाईमध्ये उत्तरप्रदेशात रचले जाणारे एक भयंकर कट उघडकीस आले आहेत. यूपी एटीएसने 6 पीएफआय सदस्यांची चौकशी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी बिहारच्या फुलवारी शरीफमध्ये तयार होत असलेल्या मिशन गझवा हिंद-2047 मध्ये सहभागी असल्याचे सांगितले आहे. उत्तरप्रदेशमधील त्यांचे सहकारी या मिशनसाठी निधी गोळा करत होते, अशी कबुलीही त्यांनी दिली आहे. एवढेच नाही तर मुस्लिम तरुणांमध्ये धर्मांधतेची शिकवण देऊन त्यांना मिशनशी जोडले जात होते.

NIA ने 21 सप्टेंबर रोजी रात्रीपीएफआयवर छापासत्र सुरू केले. 22 जणांना केरमधून, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून प्रत्येकी 20-20, तमिलनाडूमधून 10, आसममधून से 9, उत्तर प्रदेशातून 8, आंध्र प्रदेशातून 5, मध्य प्रदेशातून से 4, पुडुचेरी आणि दिल्लीतून 3-3 आणि राजस्थानमधून 2 असे देशभरात पीएफआयच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने पीएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष ओएमएस सलाम आणि दिल्ली अध्यक्ष परवेज अहमद यांनाही अटक केली आहे.

एनआयएच्या कारवाईशिवाय एटीएस गेल्या 3 महिन्यांपासून यूपीमध्ये पीएफआयच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती. जुलै 2022 मध्ये बिहारमधील फुलवारी शरीफ, पाटणा येथे NIA च्या कारवाईने उघड झाले की, PFI सदस्य 2047 पर्यंत भारताला मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी ब्लू प्रिंट तयार करत होते. यूपी एटीएस प्रमुख नवीन अरोरा यांच्या म्हणण्यानुसार, बिहार पोलिसांच्या इनपुटवर, त्यांची टीम लखनऊमधून गजवा हिंदवर काम करणार्‍या पीएफआय सदस्यांचे सहायक वकील नूरुद्दीनच्या अटकेपासून त्यावर काम करत होती. त्यांच्या तपासात असे आढळून आले की, नरुद्दीन तुरुंगात असलेल्या लोकांना मदत करत असे.



एटीएस प्रमुखांनी सांगितले की, त्यांनी मेरठ येथून 4 आणि वाराणसी येथून 2 पीएफआय सदस्यांना ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान या सहाही संशयितांनी त्यांच्या धोकादायक योजनांबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या कार्यालयातून जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये आणि त्यांच्या मोबाईलमध्ये काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत, जे त्यांच्या त्यांनी दिलेल्या जबाबाशी जुळत आहेत.


अहमद बेग गिरफ्तार -एनआयए आणि एटीएस व्यतिरिक्त, यूपी एसटीएफने लखनऊमधील मक्का गंज येथील रहिवासी अहमद बेग याला अटक केली आहे. अहमद बेग 2018 पर्यंत नदवा कॉलेजमध्ये शिकवायचे. एवढेच नाही तर तो द्वेष आणि धर्मांधतेची शाळाही चालवत होता. जिथे तो मुस्लीम तरुणांच्या मनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि देशाविरुद्ध द्वेषभावना भरली जात असे. आणि त्यांच्या विरोधात शस्त्रे उचलण्यासाठी त्यांना तयार केले जात असे. अहमद बेग पीएफआयच्या मिशन गाजवा हिंद 2047 साठी आखाती देशांकडून निधी गोळा करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

यूपी एटीएसच्या तपासातअसे समोर आले आहे की, यापूर्वी कानपूरमधून अटक करण्यात आलेल्या 19 वर्षीय हबीबुलने सोशल मीडियाच्या माध्यमातून पीएफआयच्या सदस्यांना द्वेषपूर्ण व्हिडिओ पाठवले होते. या व्हिडिओंमुळे मुस्लिम तरुणांमध्ये द्वेष आणि कट्टरता निर्माण होत होती. बिहारमधील फुलवारी शरीफ येथून अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून एनआयएला हबीबुलचे बनवलेले व्हिडिओ मिळाले होते, जे पाकिस्तानमध्ये बसलेल्या त्याच्या मालकाने बनवण्याचे आदेश दिले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details